सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची नोकरभरती स्थगित:भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याच्या अनेक तक्रारीनंतर सहकार खात्याचा निर्णय

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकरभरतीला तत्काळ स्थगिती सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकरभरतीला राज्य शासनाच्या सहकार विभागाने स्थगिती दिली आहे. या संदर्भात सहकार विभागाने जिल्हा मध्यवर्ती बँकेला पत्राद्वारे आदेश काढले असून त्यात म्हटले आहे की, उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठातील याचिकेवर अंतिम निर्णय होईपर्यंत वर्क वेल इन्फोटेक या एजन्सीमार्फत राबविण्यात आलेली नोकरभरतीची प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी व त्याबाबतचा अनुपालन अहवाल शासनास सादर करावा. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक सहकारातील प्रतिष्ठित बँक म्हणून ओळखली जाते. या बँकेवर सर्व राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते संचालक आहेत. त्यामुळे बँकेच्या नोकरभरतीला स्थगिती आल्याने आश्चर्य व्यक्त होत असून खळबळ उडाली आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकरभरतीला स्थगिती
महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग तसेच सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. संबंधित प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात (याचिका क्र. १६९१) प्रलंबित असून, अंतिम निर्णय होईपर्यंत भरती प्रक्रिया थांबविण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील विविध शाखांमधील 323 जागांसाठी तब्बल 32 हजार अर्ज आले होते.त्यापैकी 28 हजार लोकांनी परीक्षा दिली होती.
परीक्षा एकाच वेळी conduct करायला हवी होती परंतु सातारा जिल्यात पुरेसे exam center नसल्या कारणामुळे हि exam पुणे येथे shifts मध्ये घेण्यात अली परंतु या परीक्षेवर संशय घेण्यात येत आहे.
प्रतिक्षित उमेदवारांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण
सदर भरती प्रक्रिया २०२४ मध्ये ‘वर्कवेल इन्फोटेक प्रा. लि.’ या एजन्सीमार्फत राबविण्यात आली होती. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर ही भरती तात्काळ स्थगित करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, या आदेशाची अंमलबजावणी करून त्याचा अनुपालन अहवाल शासनाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, त्याची प्रत कोल्हापूर येथील विभागीय सहनिबंधक कार्यालयालाही पाठविणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयामुळे भरती प्रक्रियेची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याने हायकोर्टात गेलो – किशोर शिंदे
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकरभरतीला स्थगिती
दरम्यान श्रीमंत महाजी शिंदे शेतकरी संस्था महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष किशोर शिंदे यांनी यासंदर्भात सांगितले की, आमच्या संस्थेच्या वतीने यासंदर्भात सातारा जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे चेअरमन नितीन काका पाटील व इतरांच्याकडेही या संस्थेकडून भरती करू नये या संदर्भात तक्रारी अर्ज दिले होते. परंतु त्यांनी दुर्लक्ष केल्याने आम्ही उच्च न्यायालयात यासंदर्भात गेलो आहोत. म्हणूनच आता सहकार खात्याला हे पाऊल उचलावे लागले आहे.
स्थगिती बाबत अधिकृत पत्रक.. Download

अश्याच नवनवीन updates साठी Naukri Ninja ला visit करा.
