---Advertisement---

Mulina Mofat Shikshan Yojana l मुलींना मोफत शिक्षण योजना

Mulina Mofat Shikshan Yojana

---Advertisement---

Job Details

Post Name

Qualification

Age Limit

Exam Date

Last Apply Date

Salary

Mulina Mofat Shikshan Yojana l मुलींना मोफत शिक्षण योजना महाराष्ट्र शासनाने मुलींच्या उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी “मुलींना मोफत शिक्षण योजना” सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र मुलींना व्यावसायिक आणि उच्च शिक्षण अभ्यासक्रमांसाठी 100% शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क माफी दिली जाते.

आजच्या आधुनिक काळात शिक्षण खूप महत्त्वाचे आहे आणि ते प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे. आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी मुलगा आणि मुलगी दोघांनाही सामान संधी मिळणे अतिशय आवश्यक आहे. यासोबतच देशाच्या प्रगतीसाठी सुद्धा अतिशय महत्वाचे आहे. याच सर्व गोष्टींचा विचार करून राज्य सरकार मुलींसाठी मोफत शिक्षण योजना राबवत आहे.

५ जुलै २०२४ रोजी राज्य सरकारने काढलेल्या नवीन जिआर नुसार शिक्षण विभागाकडून आता मुलींना व्यवसायिक अभ्यासक्रमांसारख्या महागड्या व उच्च शिक्षणासाठी कुठलीही फी भरावी लागणार नाही. मुलींना मोफत शिक्षण योजना या योजनेचा पात्र मुलींना ८०० पेक्षा जास्त कोर्सेस मोफत मिळणार असल्याची माहिती उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली आहे. या कोर्सेस चा फायदा घेतल्यात मुलींना भविष्यात चांगली नौकरी मिळण्याची संधी आहे.

Mulina Mofat Shikshan Yojana

मुलींना मोफत शिक्षण योजना सुरु करण्याचा मुख्य उद्देश आहे मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रेरित करणे तसेच आत्मनिर्भर बनवणे आहे. आजही राज्यातील काही ग्रामीण भागात मुलगी म्हणजे ओझं अशी चुकीची समजूत आहे, पण वास्तव वेगळं आहे. मुलींनी आपल्या कर्तृत्वाने सिद्ध करून दाखवले आहे की त्या मुलांपेक्षा कुठेही कमी नाहीत. आज प्रत्येक क्षेत्रात मुली काम करतात आणि हे आपल्या सगळ्यांसाठी कौतुकास्पद आहे.

अनेक ठिकाणी समाजातील मुलींना आर्थिक अडचणींमुळे किंवा लिंगभेदामुळे शिक्षणापासून वंचित केल्या जाते. Mulina Mofat Shikshan Yojana प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च आणि महागड्या व्यवसायिक व तांत्रिक अभ्यासक्रमांपर्यंतचे शिक्षण फी शिवाय (मोफत) मिळू शकते. त्यामुळे मुलींना शाळा, महाविद्यालय किंवा प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घेणे सोपे होते.

यामुळे शाळाबाह्य मुलींना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणता येते आणि त्यांचे करिअर घडवण्याची संधी मिळते. शिक्षणामुळे मुली आत्मनिर्भर होतात, चांगल्या नोकऱ्या किंवा व्यवसायाच्या संधी मिळवू शकतात आणि परिणामी समाजातील लवकर लग्नाचे प्रमाण कमी होते.

योजनेचा उद्देश

  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलींना उच्च शिक्षणाची संधी देणे
  • मुलींचा शिक्षणातील टक्का वाढवणे
  • अभियांत्रिकी, मेडिकल, फार्मसी, तांत्रिक शिक्षणासाठी आर्थिक मदत
  • गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांवरील फीचा भार कमी करणे

कोणत्या अभ्यासक्रमांसाठी ?

  • Engineering
  • Medical
  • Pharmacy
  • Polytechnic
  • Agriculture
  • Professional Degree Courses
  • Technical Courses

पात्रता (Eligibility)

  • महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
  • मुलगी असणे आवश्यक
  • CAP Admission द्वारे प्रवेश घेतलेला असावा
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹8 लाखांपेक्षा कमी असावे
  • OBC / EWS / SEBC प्रवर्गातील विद्यार्थिनींना विशेष लाभ

ही योजना खालील संस्थांमध्ये लागू आहे:

  • शासकीय महाविद्यालये
  • अनुदानित महाविद्यालये
  • तंत्रनिकेतन
  • सार्वजनिक विद्यापीठे
  • Government Aided Institutes

खाजगी स्वयं-अर्थसहाय्यित विद्यापीठांमध्ये काही ठिकाणी लाभ लागू नसू शकतो.

अर्ज प्रक्रिया

  1. महाडीबीटी पोर्टलला भेट द्या
  2. नवीन Registration करा
  3. Login करून Scholarship Section उघडा
  4. आवश्यक योजना निवडा
  5. Documents Upload करा
  6. Final Submit करा

See Official Website..Click Here

“मुलींना मोफत शिक्षण योजना” ही महाराष्ट्र शासनाची अत्यंत महत्त्वाची योजना असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी मोठी मदत मिळत आहे. Engineering, Medical, Pharmacy आणि इतर Professional Courses मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी ही सुवर्णसंधी आहे.

See Also..EdCIL Bharti 2026 l एडसिल इंडिया लिमिटेड मध्ये 879 जागांसाठी भरती

naukrininja.com

नमस्कार मित्रहो Naukrininja.cpm या आपल्या website वर आपले मनःपूर्वक स्वागत आहे. मी गेली ४ वर्ष स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहे.मला अभ्यास करताना ज्या अडचणी आल्या त्या अडचणी गरजु व ग्रामीण भागातील विद्यार्थांना येऊ नये म्हणून या website ची स्थापना केली.या वेबसाईट वर तुम्हाला स्पर्धा परीक्षा नवीन जाहिरात updates, काही महत्वाचे मराठी व्याकरण,स्पर्धा परीक्षा निकाल अश्या काही महत्वाच्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करत आहे.सदर website वरील माहिती विविध online,offline, तसेच स्वतःच्या अभ्यासा वरून घेतली अथवा पुरवली जाते.आपल्या सर्वांचे सहकार्य नेहमी सोबत ठेवाल ही विनंती

Related Job Posts

Leave a Comment