Diwali Nibandh In Marathi l दिवाळी निबंध

Majha Avadta San – Diwali Nibandh In Marathi l दिवाळी निबंध दिवाळी किंवा दीपावली हा प्रकाशाचा हिंदू सण आहे, जो इतर रुपांत इतर भारतीय धर्मांमध्येही साजरा केला जातो. “अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे” प्रतीक म्हणून या सणाला ओळखतात. हिंदू चंद्रमास आश्विन (अमंता परंपरेनुसार) आणि कार्तिक या महिन्यांत म्हणजे सप्टेंबर आणि नोव्हेंबरच्या मध्यात दिवाळी साजरी केली जाते.हा उत्सव साधारणपणे पाच ते सहा दिवस चालतो.दिवाळीचा सण हा 6 दिवसाचा सण आहे. हा सण वसुबारस पासून सुरू होऊन भाऊबीज पर्यंत साजरा केला जातो. या सणामध्ये वसु-बारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी-पूजन, पाडवा आणि भाऊबीज हे महत्त्वाचे दिवस असतात. दिवाळीचा सण प्रामुख्याने उत्साह आणि आनंदात साजरा केला जातो. 

Diwali Nibandh In Marathi - माझा आवडता सण दिवाळी मराठी निबंध

Maza Avadta San Essay In Marathi या उत्सवादरम्यान लोक त्यांची घरे, मंदिरे आणि कार्यस्थळे दिवे, मेणबत्त्या आणि कंदीलांनी प्रकाशित करतात.हिंदू उत्सवाच्या प्रत्येक दिवशी पहाटे सुगंधी उठणे लावून स्नान करतात.दसऱ्याच्या 20 दिवसानंतर दिवाळी येते. दसऱ्या नंतरच दिवाळीसाठीची घरा घरात जय्यत तयारी सुरू असते. घराची डाग-डुजी, स्वच्छता करणे, रंग करणे, नवे कपडे घेणे, घरा-घरात नाना प्रकाराचे गोड-धोड केले जातात. घरा-घरात रांगोळ्या काढतात. आकाश कंदील लावतात. नवे कपडे घालतात. फटाके आणि रांगोळीच्या सजावटीसाठी देखील दिवाळी ओळखली जाते. मेजवानी आणि मिठाई हा या सणाचा मुख्य भाग आहे.

Majha Avadta San Essay In Marathi – केवळ कुटुंबांसाठीच नव्हे तर समुदाय आणि विशेषतः शहरी भागातील लोकांसाठी दिवाळी म्हणजे वार्षिक एकत्र येण्याचा कालावधी असतो. शहरांतील उद्यानांमध्ये संगीत आणि नृत्य सादरीकरणासह सामुदायिक मेळ्यांचे आयोजन केले जाते.काही हिंदू, जैन आणि शीख लोक सणासुदीच्या काळात जवळच्या आणि दूरच्या कुटुंबांना दिवाळी ग्रीटिंग कार्ड आणि भारतीय मिठाई पाठवतात.

Diwali chya Hardik Shubhechha In Marathi Font

Deepavali Shubhechha – दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ! Diwalichya Hardik Shubhechha

Maza avadta san diwali nibandh in marathi

दिवाळी या सणाला दीपावली असे देखील म्हणले जाते. दीपावली या शब्दाची उत्पत्ती संस्कृत मधील दोन शब्दांच्या उच्चाराने झाली. “दीप” म्हणजे “दिवा” आणि “आवली” म्हणजेच “ओळ”. याचा संपूर्ण अर्थ पाहिला तर दिव्यांची एका ओळीत केलेली रचना अर्थात दिवाळी. काही जण दिपवाळी असे देखील म्हणतात, पण शुद्ध शब्द हा दीपावली आहे. वेगवेगळ्या शब्द प्रयोगानुसार त्याचा उच्चार बदलतो. दिवाळीच्या सुट्टीत मामाच्या गावी जाणे हि एक नवीन ओळख निर्माण झाली आहे.प्रत्येक जण दिवाळी साठी आपल्या मामाच्या गावी जातोच.

Diwali Shubhechha Marathi Banner

diwali images in marathi

वसु बारस

अंध:काराकडून प्रकाशाकडे तर अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा सण म्हणजे दीपावली. वसुबारस म्हणजेच गोवत्सद्वादशी हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातोभारतीय संस्कृतीप्रमाणे गायीला फार महत्त्व आहे. तिला माताही म्हणतात. ती सात्त्विक असल्याने सर्वांनी या पूजनाद्वारे तिच्या सात्त्विक गुणांचा स्वीकार करावा, असे म्हटले जाते. सत्त्वगुणी, म्हणजेच आपल्या सहवासाने दुसर्‍याला पावन करणार्‍या, आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करणार्‍या, आपले अंग-प्रत्यंग अर्पण करून समाजाला उपयोगी पडणार्‍या, शेतीला आपल्या शेणाद्वारे खत देऊन पौष्टिकत्व आणणार्‍या, शेतीला उपयुक्‍त अशा बैलांना जन्म देणार्‍या गोमातेचे या दिवशी पूजन करतात.

happy diwali images marathi

ज्या ठिकाणी गोमातेचे संरक्षण, संवर्धन होऊन तिला पूज्यभाव देऊन तिचे पूजन होते, त्या ठिकाणी ती व्यक्‍ती, तो समाज, ते राष्ट्र भरभराटीस आल्याशिवाय राहत नाही, असे सांगितले जाते. अशा गोमातेचे प्रथम तिच्या वत्सासहित पूजन करून दीपोत्सवाला सुरुवात होते.

धनत्रयोदशी

धनतेरस किंवा धनत्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या १३ व्या दिवशी असते. या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाला. म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. काही लोक या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करतात. दिवाळी सण असताना धनत्रयोदशीस एक आगळेवेगळे स्वरूप येते. व्यापारी वर्गात या पूजेचे महत्त्व विशेष असते. या दिवशी संध्याकाळी दुकानांमध्ये पूजा केली जाते. हिशेबाच्या नव्या वह्यांचा वापर या दिवसापासून सुरू करण्याचा प्रघात आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुख्यत: धनाची आणि कुबेराची पूजा केली जाते.

diwali images in marathi
diwali images in marathi

धनत्रयोदशीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की, धनत्रयोदशीला लक्ष्मीची पूजा केल्याने घरात धन, सुख आणि समृद्धी येते. यासोबतच संपत्तीचा देव कुबेर यांचीही पूजा या दिवशी केली जाते. हिंदू मान्यतेनुसार, भगवान विष्णूचा अवतार भगवान धन्वंतरी यांचा जन्म धनत्रयोदशीच्या दिवशी झाला होता. त्याची पूजाही केली जाते.

नरक चतुर्दशी

नरक चतुर्दशी दरवर्षी कार्तिक महिन्याच्या अमावस्येच्या एक दिवस आधी येतो. हिंदू धर्मात नरक चतुर्दशीला खूप महत्त्व आहे. या ब्रह्म मुहूर्तावर स्नान करून यमाची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर स्नान करून यमराजाची पूजा करणारा नरकात जाण्यापासून वाचतो आणि स्वर्गप्राप्ती करतो अशी धार्मिक मान्यता आहे. तसेच संध्याकाळी यमाची पूजा केल्याने अकाली मृत्यूचे भय राहत नाही. असे म्हटले जाते की जेव्हा भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला तेव्हा त्यांनी शरीराला तेल आणि उटणे लावून आंघोळ केली. तेल आणि उटणं लावून आंघोळ करण्याची ही परंपरा त्या दिवसापासून सुरू झाली. असे केल्याने नरकापासून मुक्ती मिळून स्वर्ग आणि सौंदर्याचे वरदान मिळते, अशी धार्मिक धारणा आहे.

diwali greeting card in marathi

नरक चतुर्दशी सण नरकासुर आणि भगवान श्रीकृष्ण यांच्याशी संबंधित आहे. पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की एके काळी नरकासुर नावाचा राक्षस होता ज्याने आपल्या शक्तीचा दुरुपयोग करून देव, देवी आणि ऋषींसह सोळा हजार राजकन्यांना कैद केले होते. यानंतर, राक्षसांच्या अत्याचाराने त्रासलेल्या देवता आणि राजकन्यांनी भगवान श्रीकृष्णाची मदत मागितली, त्यानंतर श्रीकृष्णाने त्यांचा वध केला. हिंदू धर्माच्या धर्मग्रंथानुसार या दिवशी नरकासुरापासून मुक्ती मिळाल्याच्या आनंदाने संपूर्ण पृथ्वी प्रसन्न झाली होती आणि सर्व देवताही खूप आनंदी होते. या दिवशी नरकासुराच्या वधाच्या स्मरणार्थ नरक चतुर्दशीचा सण साजरा केला जातो, याला छोटी दिवाळी असेही म्हणतात.

Diwali Nibandh – Diwali Padwa Meaning In Marathi

पाडवा

happy diwali wishes in marathi images

padvyacha shubhechha diwali – दिवाळीचा पुढचा दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बळी प्रतिपदा किंवा पाडवा असे ही म्हणतात. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला गेला आहे. या दिवशी व्यापारी वर्ग नवं वर्षाची सुरुवात करतात. बळी राजाचे रांगोळीने चित्र काढतात आणि त्यांची पूजा करतात. तसेच नवीन कामाला सुरुवात करतात. याच दिवशी राजा बळीचे गर्वहरण श्री विष्णूनी वामनरूप धरुनी केले होते. या दिवशी घरातील स्त्रिया आपल्या वडीलधारी करता पुरुषाला औक्षण करतात. बाई आपल्या नवऱ्याला वडिलांना, सासऱ्यांना औक्षण करते. नवरा, वडील, सासरे तिला काही भेट वस्तू देतात. तसेच मुली देखील आपल्या वडिलांचे औक्षण करतात.

भाऊबीज 

दीपोत्सवातील शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा सण म्हणजे भाऊबीज. बहीण आणि भावाच्या नात्यातील गोडवा वृद्धिंगत करणारा, नात्याची वीण घट्ट करणारा सण म्हणून भाऊबीज साजरी केली जाते. या दिवसाला यमद्वितीया असेही देखील म्हणतात. हिंदीत या सणास भाईदूज असे म्हटले जाते. पश्चिम बंगालमध्ये भाई फोंटा या नावाने हा उत्सव साजरा केला जातो. हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये भाऊबीजेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नेपाळमध्ये देखील हा दिवस भाईतिहार म्हणून साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते.संध्याकाळी चंद्राची कोर बघून बहीण आधी चंद्राला नंतर भावाला ओवाळते.

happy diwali wishes in marathi hd

भाऊ बहिणीला ओवाळणी देतो. या मागील शास्त्र असे की भाऊ चिरंजीव व्हावा आणि त्याची प्रगती व्हावी. भाऊ आपल्या बहिणीला यथाशक्ती भेटवस्तू देतो. ज्या बहिणींना भाऊ नसतो त्या चंद्राला ओवाळतात. अश्या प्रकारे हा दिवाळीचा सण आनंदाने आणि उत्साहाने साजरा करण्याची पद्धत आहे.

अश्या प्रकारे दिवाळी सणाला वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे महत्व आहे.आशा करतो की निबंध तुम्हाला आवडला असेल असेच नवनवीन निबंध पाहण्यासाठी नक्की भेट द्या.

1 thought on “Diwali Nibandh In Marathi l दिवाळी निबंध”

Leave a Comment