Maza Avdta Neta Essay Yashwantrao Chavan I मराठी निबंध माझा आवडता नेता – यशवंतराव चव्हाण

Maza Avadta Neta Marathi Nibandh – Maza Avdta Neta Essay Yashwantrao Chavan I मराठी निबंध माझा आवडता नेता – यशवंतराव चव्हाण. यशवंतराव चव्हाण हे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि माझे आवडते नेते आहेत . १२ मार्च १९१३ रोजी सातारा जिल्ह्यातील देवराष्ट्रे येथे जन्मलेले यशवंतराव चव्हाण संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते . त्यांनी महाराष्ट्राच्या औद्योगिक व कृषी विकासाचा पाया रचला. साधे व्यक्तिमत्त्व, उत्कृष्ट वकृत्व आणि दूरदृष्टीमुळे ते महाराष्ट्राच्या मनावर राज्य करतात 

maza avadta neta marathi nibandh – Maza Avdta Neta Essay Yashwantrao Chavan I मराठी निबंध माझा आवडता नेता – यशवंतराव चव्हाण

maza avadta neta marathi nibandh - Maza Avdta Neta Essay Yashwantrao Chavan I  मराठी निबंध माझा आवडता नेता - यशवंतराव चव्हाण

प्रस्तावना:
महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत ज्या नेत्यांचे योगदान सर्वोच्च आहे, अशा मोजक्या नेत्यांमध्ये यशवंतराव चव्हाण यांचे नाव अग्रस्थानी आहे. त्यांना महाराष्ट्राचे भाग्यविधाते मानले जाते

बालपण व शिक्षण

यशवंतरावांच्या पूर्वजांचे मूळगांव खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर हे होते. गावातील एका व्यक्तिला सावकराकडून कर्ज हवे होते. या कर्जासाठी चव्हाण कुटुंबातील एक पूर्वज जामीन झाला. कर्जदाराने कर्ज न भागविल्याने सावकाराने जामीनदाराचा जमीन-जुमला ताब्यात घेतला. जमीन गेल्याने निराधार झालेल्या चव्हाण कुटुंबाने ढवळेश्वर सोडले व उदरनिर्वाहासाठी विट्याला येऊन स्थायिक झाले. हा प्रसंग यशवंतरावांच्या पणजोबांच्या अगोदरचा आहे. यशवंतरावांच्या आजोबांना दोन मुलगे. यापैकी थोरले रामचंद्र व धाकटे बळवंतराव.

रामचंद्र चार पुस्तके शिकल्यामुळे त्यांना ‘बेलिफ’ म्हणून सरकारी नोकरी मिळाली. पुढे काही वर्षांनी शेतीवर भागत नसल्याने त्यांनी आपले लहान बंधू म्हणजेच यशवंतरावांचे वडील बळवंतराव यांनाही बेलिफाची नोकरी मिळवून दिली. नोकरीनिमित्त यशवंतरावांच्या वडिलांनी विटे, दहिवडी, कराड या ठिकाणी जावे लागले. यशवंतरावांचा जन्म झाला त्यावेळी वडील कराड येथे नोकरीस होते. त्यांनी कराड येथे बरीच वर्षे नोकरी केल्यामुळे चव्हाण कुटुंब कराडला कायमचेच स्थायिक झाले. महाबळेश्वरमध्ये उगम पावून व कराडच्या उत्तरेकडून वहात येणारी कृष्णा व दक्षिणेकडून वहात येणारी कोयना या दोन बहिणींचा संगम कराड येथे होतो. पुढे त्यांचा एकच प्रवाह बनून तो पूर्वेकडे वहात जातो.कराडला प्लेगची साथ आल्याने यशवंतरवांच्या वडिलांनी आपल्या पत्नीला व मुलाबाळांना आपल्या सासूरवाडीला ‘देवराष्ट्रे’ येथे पाठविले.

देवराष्ट्रे येथील आजोळच्या लहानशा घरात ही सर्व मंडळी राहू शकणार नाहीत म्हणून यशवंतरावांच्या मामाने गावातीलच महिंदवाड्याच्या शेजारी असणा-या एका वाड्यात त्यांची राहण्याची व्यवस्था केली. मामाच्या घरापासून हे घर जवळच असल्याने यशवंतराव व त्यांच्या अन्य दोन भावडांचे दिवसभराचे वास्तव्य मामाच्या घरीच असायचे. यशवंतरावाचे वय त्यावेळी अवघे चार वर्षांचे होते. दुपारच्या वेळी मामाच्या दारासमोर यशवंतराव खेळत असताना त्यांना समोरुन येत असणारे त्यांचे वडील दिसले.

वडिलांच्या दर्शनाने सुखावलेल्या यशवंतरावांनी अत्यानंदाने त्यांना मिठी मारली. प्लेगच्या साथीत सापडलेले बळवंतराव आपल्या मुलाला कडेवर घेऊ शकले नाहीत.

Maza Avdta Neta Essay Yashwantrao Chavan

राजकीय कारकीर्द

इ.स. १९५६ मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. तसेच १ मे, १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणूनही त्यांचीच निवड झाली. इ.स.१९६२ मध्ये चीन युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी यशवंतरावांची नेमणूक देशाच्या संरक्षणमंत्रीपदावर केली.

हा त्यांच्या कारकिर्दीचा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल. पुढील काळात ते भारताचे उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री या पदांवर होते. केंद्रात जनता पक्षाचे सरकार असताना (१९७७-७८) ते विरोधी पक्षनेते होते. तसेच पुढे ते आठव्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्षही झाले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी काही महत्त्वाच्या योजना राबवल्या

यशवंतराव चव्हाण यांनी कृषिविषयक विचार मांडताना शेतीच्या मालकीहक्काचा प्रश्न, भूमिहीनांचा प्रश्न व कृषी विकासासाठी उपाय यावर अधिक भर दिला. त्यांच्या मते, जमीन कसणारा शेतजमिनीचा मालक असावा. यशवंतरावांनी सामाजिक क्षमता व सामाजिक न्यायाच्या दृष्टीकोनातून शेतीचा विचार केला.

भारतात शेती क्षेत्रात भूमिहीनांची संख्या अधिक आहे. म्हणून वाजवीपेक्षा अधिक जमिनी असणाऱ्या लोकांनी त्यांच्या जमिनीचा एक ते दोन टक्के जमीन त्यांना द्यावी. तसेच जमीन अविकसित असल्याने ती अनुत्पादक व पडीक राहिली आहे. अशा जमिनी लागवडीखाली आणणे आवश्यक आहे. शेती व्यापारी तत्त्वाने केली पाहिजे. शेतीच्या आधुनिकीकरणाच्या मार्गातील अडथळे दूर केले पाहिजेत. नद्यांच्या पाण्याचा शेतीसाठी वापर केला पाहिजे. नद्यांवर धरणे बांधली पाहिजेत. धरणे बांधल्याने विस्थापित होणाऱ्या लोकांचे पुनर्वसन केले पाहिजे. शेतकऱ्यांनी कृषीशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे, असे मत त्यांनी मांडले.

यशवंतराव चव्हाण हे समतोल विकासाचे पुरस्कर्ते होते. म्हणून विकास योजना आखताना अविकसित विभागांचा आधी विचार केला पाहिजे. ग्रामीण औद्योगिकीकरणाबाबत ते म्हणतात की, ग्रामीण भागात उद्योग सुरू करून शेती आणि उद्योगांची सांगड घातली जावी. शहरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेची सांगड घालून शहरांकडे धाव घेणारा श्रमिकांचा लोंढा थोपविता येईल.

औद्योगिक विकासासाठी नियोजन महत्त्वपूर्ण आहे. देशाचा संतुलित आर्थिक विकास व्हावा यासाठी ते औद्योगिक विकासाच्या मास्टर प्लानची कल्पना मांडतात. अविकसित भागात विकासासाठी त्यांनी संयुक्त औद्योगिक क्षेत्राची कल्पना मांडली. याशिवाय, राष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी ते सहकाराचा पुरस्कार करतात. भारतासारख्या कृषिप्रधान देशाच्या विकासासाठी सहकारी तत्त्वे फार उपयुक्त ठरतात

Maza Avdta Neta Essay Yashwantrao Chavan I मराठी निबंध माझा आवडता नेता – यशवंतराव चव्हाण

यशवंतराव चव्हाणांच्या जीवनाधारीत पुस्तके

  • आधुनिक महाराष्ट्र के शिल्पकार (लेखक के.जी. कदम)
  • आमचे नेते यशवंतराव (रमणलाल शहा)
  • कृष्णाकाठचा माणूस (अरुण शेवते)
  • घडविले त्यांना माऊलीने (ग.शं. खोले)
  • Chavan and the Trouble Decade (T.V. Kunnikrishnan)
  • Chavan,The Man of Crisis (B.B.Kale)
  • नवमहाराष्ट्राचे शिल्पकार (दत्तात्रय बारसकर)
  • भारताचे सुपुत्र यशवंतराव चव्हाण (डॉ.पंजाबराव जाधव)
  • Man of Crisis (Baburao Kale)

मराठी निबंध माझा आवडता नेता – यशवंतराव चव्हाण

  • महत्त्वाची पदे:
    • मुख्यमंत्री (महाराष्ट्र): १९५६ ते १९६२ (द्वैभाषिक मुंबई राज्य आणि महाराष्ट्र राज्य) [१५].
    • संरक्षणमंत्री (भारत): १९६२-६६ (चीन आणि पाकिस्तान युद्धाच्या काळात महत्त्वाची भूमिका) [१५].
    • गृहमंत्री (भारत): १९६६-७० [१५].
    • अर्थमंत्री (भारत): १९७०-७४ [१५].
    • उपपंतप्रधान: १९७९-८० [१०].
  • वैशिष्ट्ये: ते ‘कृष्णाकाठचा’ सुपुत्र म्हणूनही ओळखले जातात. त्यांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू होते—ते एक कुशल राजकारणी, थोर साहित्यिक, उत्तम वाचक आणि रसिक होते [६].
  • निधन: २५ नोव्हेंबर १९८४ रोजी नवी दिल्लीत त्यांचे निधन झाले

See Also – माझी शाळा निबंध मराठी 800 शब्द Mazi Shala Marathi Nibandh

अश्याच नवनवीन updates साठी Naukri Ninja ला visit करा.

About naukrininja.com

Check Also

Makar Sankranti Essay

Makar Sankranti Nibandh मकर संक्रांत निबंध l Makar Sankranti Essay

makar sankranti marathi nibandh – भारत हा कृषीप्रधान देश आहे त्यामुळे या भारत देशात कृषी व्यवस्था …

Leave a Reply