mazi aai nibandh in marathi l माझी आई निबंध मराठीmazi aai nibandh in marathi l माझी आई निबंध मराठी

आपण Mazi aai nibandh in marathi l माझी आई निबंध मराठी आपण माहिती करून किंवा वाचण्यासाठी आला आहेत तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहेत आपण माझी आई या विषयावर थोडक्यात असा निबंध लिहणार आहोत.

आई या शब्दातील दोन अक्षरे म्हणजे आ आणि ई. आई म्हणजे शक्ती आणि भक्ती साऱ्या विश्वास सामावणारा ईश्वर म्हणजे आई. आई हा अतिशय प्रेमळ व सुंदर शब्द आहे. आई माय माता माऊली जन्मदात्री जननी असे अनेक शब्द आई साठी संबोधले जातात. आईचे प्रेम हे जगातील निस्वार्थ आणि पवित्र प्रेम आहे.

आई हा आपल्या आयुष्यातील पहिला आणि शेवटचा गुरु असते. ll स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ll आई आपल्याला चालायला शिकवते, बोलायला शिकवते आणि जगण्याची कला शिकवते. आई ही आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे भांडवल आहे.

माझी आई निबंध मराठी Majhi Aai Nibandh Marathi

mazi aai nibandh in marathi l माझी आई निबंध मराठी

100 lines mazi aai in marathi

आईचे प्रेम
आई हा शब्द जरी साधा, सोपा वाटला तरी संपूर्ण जगाला सामावून घेण्याची ताकद या शब्दात आहे.आईचे प्रेम हे जगातील सर्वात निस्वार्थ आणि पवित्र प्रेम आहे. आई आपल्या मुलांवर कोणत्याही अपेक्षेशिवाय प्रेम करते. ती आपल्या मुलांच्या सुखासाठी सर्वस्व अर्पण करते. आपली आई आपल्यला सर्वांपेक्षा जास्त ओळखत असते.आपल्या मुलांना कायमच समर्थित करते आणि त्यांच्या पाठीशी उभी राहते.

Mazi Aai Nibandh

माझ्या आईचं नाव सुनीता आहे. ती एक उत्तम गृहिणी आहे. याशिवाय ती उच्च शिक्षित आणि हुशार आहे. ती खूप मेहनती आहे तसेच ती कुटूंबातील सगळ्यांची काळजी घेत असते. ती एक प्रेमळ आणि दयाळू स्त्री आहे. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात चांगल्या वाईट काळात आई आपल्या सोबत असते. आई-मुलाचे नाते अनमोल असते. ते कधीही तुटू शकणार नाही. आई ही प्रेमाची, समर्पणाची, सौजन्याची आणि संवेदनशीलतेची प्रतिमा आहे. आई ही आपल्या जीवनातील पहिली गुरु आणि शिक्षक असते. आईंच्या मार्गदर्शनावर जीवन जगणे हे सदैव आपल्यासाठी एक सुखद अनुभव असतो. आई हा असंख्य माणसांच्या जीवनात असलेल्या मार्गदर्शक आणि उत्तम शिक्षक आहे. 

” आई लंगड्याचा पाय असते,
वासराची गाय असते,
दुधावरची साय असते.”

Majhi Aai Nibandh in Marathi

माझी आई ही जगातील सर्वात सुंदर आणि दयाळू व्यक्ती आहे. ती मला खूप प्रेम करते आणि माझ्यासाठी सर्वस्व अर्पण करते. आई म्हणजे माझ्यासाठी जग.आई मला रोज सकाळी लवकर उठवते, माझ्यासाठी नाश्ता करते आणि मला शाळेसाठी तयार करून देते. ती मला माझे अभ्यास करायला मदत करते आणि माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे देते.आई मला खूप चांगली गोष्टी शिकवते. ती मला कठीण परिस्थितीला सामोरे जायला शिकवते, इतरांच्या भावना समजून घ्यायला शिकवते आणि नेहमी सकारात्मक राहण्यास शिकवते.आई ही जगातील सर्वात मोठी देण आहे.

आई ही आपल्या आयुष्यातील पहिली आणि शेवटची गुरू असते. आई आपल्याला जगण्याची कला शिकवते. आई आपल्या जीवनात खूप महत्त्वाची भूमिका निभावते. ती आपली पहिली शिक्षिका असते, जी आपल्याला जीवन जगण्याचे पाठ शिकवते. आई आपल्याला चांगले-वाईट ओळखायला शिकवते आणि आपल्याला योग्य मार्गावर चालायला शिकवते. आई आपल्याला कठीण परिस्थितीत सामोरे जायला शिकवते आणि आपल्याला जिंकण्याची प्रेरणा देते. आई आपल्याला प्रेम करायला शिकवते आणि इतरांना आदर द्यायला शिकवते. आई आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या आधार आहे.

आपली आई आपल्यासाठी खूप झटत असते, खूप काही गोष्टी करते तरीही आपण तिच्याकडे दुर्लक्ष करून स्तुती करायला कमी पडतो. पण खरचं तिने केलेल्या कामाचे कधीतरी तिने बनविलेल्या पदार्थाचे आपण कौतूक केले तर तिलाही किती छान वाटेल याचा आपण विचार केला पाहिजे. पहिला शब्द जो मी उच्चारला, पहिला घास जिने मला भरविला, हाताचे बोट पकडून जिने मला चालायला शिकवले आणि मी आजारी असताना जिने माझ्या अंथरुणापाशी रात्रंदिवस काढले, ती फक्त माझी आई. 

” आई म्हणजे देव पृथ्वीवरचा 

आई म्हणजे साठा सुखाचा

आई म्हणजे मैत्रीण गोड

आई म्हणजे मायेची ओढ “

Mazi Aai Nibandh

असं म्हटलं जातं की देव स्वतः या जगात येऊ शकत नाही म्हणून त्याने आईला या जगात पाठविले. आई म्हणजे देवाचं दुसरं रूप. आई नोकरी करत नाही किंवा पैसे कमवत नाही पण घर सांभाळण्याची मोठी जबाबदारी ती विनामूल्य पार पाडत असते. देवाने मला इतकी सुंदर आई दिली, त्यामुळे मी देवाची सदैव ऋणी आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असे म्हटले जाते. या जगात आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही. आईमुळेच आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो.

Chatrapati Shivaji Maharaj Aai

राजमाता जिजाऊ यांनी शिवरायांना घडवले म्हणून ते अखंड स्वराज्याचे ‘छत्रपती शिवाजी महाराज’ झाले.
पांडुरंग सदाशिव साने अर्थात आपले सर्वांचे लाडके साने गुरुजी यांचे हृदय तर मातृवत्सल होते. ते म्हणत, “आईचे हृदय हे सुखातही रडते, तर दुःखात ते कसे होई ?” श्यामच्या या एकच वाक्यातून त्याला आईचे मन कळलेले दिसते. खरंच श्यामच्या मागे जर त्याची एवढी सुसंस्कारी आई नसती तर एवढा समाजक्रांतिकारक श्याम घडला असता का? साने गुरुजींनी आपल्या देशासाठी जे अमूल्य योगदान दिलेले आहे, ते केवळ त्यांच्यावर त्यांच्या आईने केलेल्या संस्कारामुळेच!

आजच्या आधुनिक काळात जर विचार केला तर स्त्रीभ्रूणहत्या, यांसारख्या समस्यांनी खूप गंभीर स्वरूप धारण केलेले आहे. प्रत्येकाला ‘आई ‘ हवी असते, ‘बहीण ‘ हवी असते , ‘पत्नी ‘हवी असते परंतु ‘ मुलगी मात्र कोणाला नको असते. मुलगी जन्माला आली की सर्वप्रथम तिच्या संरक्षणाची जबाबदारी येऊन पडते. नंतरच्या काळात तिचे शिक्षण ,विवाहासाठी होणारा खर्च, त्यातूनही जर काही आपत्ती उद्भवली तर मात्र काही खरे नसते.

त्यामुळेच गर्भलिंग चिकित्सा करून मुलीला गर्भातच मारण्याचा(स्त्री भ्रूणहत्या) गैरप्रकार शिक्षित वर्गाकडून देखील केला जातो. नोबल पारितोषिक विजेते डॉ. अमर्त्य सेन यांनी एक सामाजिक सर्वेक्षण करून अहवाल सादर केला. त्यातील निष्कर्ष आणि आकडेवारी दुःखद आणि हैराण करणारी होती.मुलींची गर्भातच मारून जी हत्या केली गेली; ती झाली नसती तर करोडो स्त्रिया आज अस्तित्वात असत्या. खरे पाहत शास्त्रीय,सामाजिक,कौटुंबिक, जैविक इ.दृष्टिकोनातून स्त्रीची संख्या ही पुरुषांच्या संख्येच्या बरोबर असणे हे अत्यंत गरजेचे असते.

आपण पाहिले तर जणगणना करताना स्त्रियांच्या संख्येची तुलना पुरुषांच्या संख्येशी केली जाते.हजार पुरुषांमध्ये किती स्त्रिया आहेत. त्यामुळे जर स्त्री संख्येचे प्रमाण कमी झाले, तर मानवाचे भवितव्य धोक्यात येईल. एक चांगली, सुशिक्षित, सुजाण आई चांगली पिढी घडवू शकते. म्हणून प्रत्येक मुलीला शिक्षण देणे ही काळाची गरज आहे.

तरच शिवरायांसारखे छत्रपती निर्माण होतील. त्यामुळेच भारतीय सरकारने ‘ मुली वाचवा देश वाचवा ‘ , ” मुलगी शिकली प्रगती झाली ‘ . अशांसारखी काही बोधपर घोषवाक्य तयार करून समाजाचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. महात्मा जोतिराव फुले म्हणायचे की , ” घरातील एक मुलगा शिकला तर तो केवळ स्वतःपुरते शिकतो, परंतु घरातील एक मुलगी शिकली तर संपूर्ण कुटुंब सुशिक्षित, संस्कारित होते. ” नीट विचार केला तर या वाक्यामध्ये फुल्यांनी खूप मार्मिक आणि मोलाचे सांगितले आहे. त्यामुळे एक कर्तृत्ववान पिढी घडवायची असेल तर एक चांगली मुलगी घडणे अतिशय आवश्यक आहे . कारण भवितव्यात तीच एक चांगली आई बनणार आहे.

Few Lines on Aai

आई ही जगातील सर्वात पवित्र आणि महान नाते आहे. आई आपल्या मुलांसाठी सर्वस्व अर्पण करते. ती आपल्या मुलांचे सर्व सुख-दुःख समजून घेते आणि त्यांचे पालनपोषण करून त्यांना मोठे आणि यशस्वी बनवते.माझी आई माझ्यासाठी सर्वस्व आहे. ती माझी पहिली गुरु, माझी पहिली मित्र आणि माझी पहिली डॉक्टर आहे. ती माझ्यावर अमाप प्रेम करते आणि माझ्या प्रत्येक यशात आणि अपयशात माझ्या पाठीशी उभी राहते.माझी आई एक गृहिणी आहे.

ती सकाळपासून रात्रीपर्यंत घरात आणि आमच्यासाठी कष्ट करते. ती कधीही थकत नाही आणि नेहमी आमच्यासाठी हसतमुख असते. ती आमच्यासाठी स्वादिष्ट जेवण बनवते, आमचे कपडे धुते, आमची खोली साफ करते आणि आम्हाला अभ्यास करण्यात मदत करते.मी आज जे काही आहे ते माझ्या आईमुळेच आहे. तिने मला संस्कार दिले आणि मला चांगले वागायला शिकवले. तीने मला कधीही चुकीच्या मार्गावर जाऊ दिले नाही. ती नेहमी माझ्यासाठी प्रेरणास्थान आहे.

माझी आई माझ्यासाठी सर्वस्व आहे. मी तिच्यावर खूप प्रेम करतो.

माझी आई निबंध मराठी Majhi Aai Nibandh Marathi

माझी आई निबंध मराठी Mazi Aai Nibandh Marathi

आशा करतो कि वरील दिलेल्या माहितीने आपण संतुष्ट असाल व Competitive Exam मध्ये याचा आपल्यला खूप उपयोग होतो याच प्रमाणे Competitive Exam मध्ये विचारले जाणारे काही Samanarthi Shabd व Virudharthi Shabd, Vakprachar आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे ते ही तुम्ही अभ्यासु शकता.


वर दिलेला माझी आई निबंध आपण वाचला असाल आशा करतो आपणाला तो आवडला असेल, असेच आणखी काही महत्वाचे निबंध आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत.तरी वरील निबंध आपल्या मित्र मैत्रिणी यांना share करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *