शब्द समूहाबद्दल एक शब्द (Shabd Samuha baddal Shabd One word substitution in marathi) शब्द समूहाबद्दल एक शब्द हा घटक आपण शालेय अभ्यासक्रमा पासून शिकत आलो आहे. स्पर्धापरीक्षा (Mpsc, Combine, सरळसेवा) मध्ये देखील महत्वाचा असा घटक आहे या घटकावर आयोग प्रश्न विचारात असते.आपण असेच काही महत्वाचे शब्द पाहणार आहोत.
शब्द समूहाबद्दल एक शब्द म्हणजे काय ? अनेक शब्दांचा मिळुन शब्दसमूह बनत असतो याच शब्द समूहाबद्दल त्याच अर्थाचा एक शब्द वापरणे म्हणजे शब्द समूहाबद्दल एक शब्द होय.
Marathi grammar shabd samuha baddal ake shabd
शब्दसमूह | एकशब्द |
---|---|
✒ काम चांगले करता न येणारा | अकुशल |
✒ नाश न पावणारा | अजरामर |
✒ न जिंकता येणारा | अजिंक्य |
✒ बरोबरी करू न शकणार | अजोड |
✒ अंड्यात वाढ होऊन जन्म घेणारा सजीव प्राणी | अंडज |
✒ आत समावेश असलेला | अंतर्भूत |
✒ बऱ्याच जाडीच्या आवरणाचा भेद करून जाणारा | अतिवेधी |
✒ ज्याची तुलना कशाशीही होत नाही असा | अतुलनीय |
✒ पायात बूट वगैरे काहीही नसलेला | अनवाणी |
✒ पेशींचे विविध घटकात विघटन | अपचयी |
✒ नियमास धरून नसलेले | अपवाद |
✒ प्रकाश पलीकडे जाऊ न देणारा | अपारदर्शक |
✒ विकास न झालेला | अप्रगत |
✒ पाण्यात जन्मलेले कमळ | अंबुज |
✒ मापता मोजता न येणारे | अमाप |
✒ विपुल पिकणाऱ्या चांगल्या फळभाज्यांच्या मळा | अमृतमळा |
✒ ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही असा | अनुपम |
✒ ज्याची किंमत होऊ शकत नाही असे | अनमोल |
✒ खूप दिवस पाऊस न पडणे | अनावृष्टी |
✒ नाश न पावणारे | अविनाशी |
✒ मुद्दाम पणे पसरवलेली खोटी बातमी | अफवा |
✒ मरण नाही असा | अमर |
✒ पंच्याहत्तरावा वाढदिवस उत्सव | अमृत महोत्सव |
✒ थोडक्यात समाधानी असलेला | अल्पसंतुष्ट |
✒ डोक्यापासून पायापर्यंत | आपादमस्तक |
✒ अगदी पूर्वी पासून राहणारे | आदिवासी |
✒ ईश्वरावर विश्वास ठेवणारा | आस्तिक |
✒ दुसऱ्याच्या ताब्यात असलेला | अंकित |
✒ लेखी स्वरूपात नसलेले | अलिखित |
✒ पाऊस खूपच कमी पडणे | अवर्षण |
✒ राज्यकारभार करण्यासाठी नेमण्यात आलेले आठ प्रधान | अष्टप्रधान |
✒ कोणतीही अपेक्षा न बाळगता | असक्त |
✒ ज्याला मदत मिळत नाही असा | असहाय |
✒ सहन करण्यास कठीण | असह्य |
✒ कोणालाही शारीरिक किंवा मानसिक इजा न करणे | अहिंसा |
✒ स्वतःचे स्वतः लिहलेले चरित्र | आत्मचरित्र |
✒ वेगवेगळे पदार्थ एकत्र काही वेळ भिजत घालणे | आंबोण |
✒ राखून ठेवणे | आरक्षण |
✒ स्पष्ट करून दाखवणे | आविष्कार |
✒ एखादी कला अंगी असणे | कलाकार |
✒ कविता रचणारा | कवयित्री |
✒ कानास गोड लागणारे | कर्णमधुर |
✒ सर्व ईच्छा पूर्ण करणारा वृक्ष | कल्पवृक्ष |
✒ कठोर शब्दात केलेला उपदेश | कानउघडणी |
✒ आपल्या मताचा आग्रह न धरणे | उदारमतवादी |
✒ ग्रहाभोवती कक्षेत फिरणारा लहान ग्रह | उपग्रह |
✒ अतिशय उग्र विचाराचा | कट्टर |
✒ साधू लोकांचा लांब अंगरखा | कफनी |
✒ कठोर मनाचा | करडा |
✒ जेथे मुख्य काम केले जाते ते ठिकाण | कर्मभूमी |
✒ फटीतून पडलेले प्रकाशाचे किरण | कवडसा |
✒ कष्टाला टिकून राहणार | काटक |
✒ उलट बदल, परावर्तन | कलाटणी |
✒ फिरण्याचा मार्ग, मर्यादा | कक्षा |
✒ कृती घडवून आणणारा घटक | कारक |
✒ काम करण्याची निश्चित पद्धत | कार्यप्रणाली |
✒ एखादी गोष्ट अमलात आणणे | कार्यवाही |
✒ शेती हाच मुख्य व्यवसाय असलेला | कृषिप्रधान |
✒ दगडी कोळशापासून मिळणारा जळाऊ पदार्थ | कोक |
✒ फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली जमीन | कोरडवाहू |
✒ घोड्यावर बसण्यासाठी चामड्याचे केलेले आसन | खोगीर |
✒ व्यक्तींचा ठराविक पोशाख | गणवेश |
✒ जमिनीवर मऊ मातीचा थर देऊन तयार केलेला वाफा | गादीवाफा |
✒ लोकरीचे नक्षीदार आसन | गालिचा |
✒ शत्रूला समजणार नाही अश्या रीतीने त्यांची सर्व माहिती मिळवणारा | गुप्तहेर |
✒ शेणापासून मिळणारा जळणाचा वायू | गोबरगॅस |
✒ कामासाठी विकत घेतलेले मनुष्य | गुलाम |
✒ धान्य साठवण्यासाठी बंदिस्त जागा | गोदाम |
✒ नेहमी घरात बसून राहणार | घरकोंबडा |
✒ चार रस्ते मिळते ती जागा | चौक |
✒ सैन्याच्या तात्पुरती मुक्कामाची जागा | छावणी |
✒ निरनिराळे लोहमार्ग जेथे एकत्र येतात असे मोठे स्टेशन | जंक्शन |
✒ एखादी गोष्ट सर्वात आधी सुरु करणारा | जनक |
✒ पाण्यात राहणारे | जलचर |
✒ तप करण्याची जागा | तपोवन |
✒ घोडा बांधण्याची जागा | तबेला |
✒ शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज | तगाई |
✒ तांब्याच्या पत्र्यावर लिहलेले लेख | ताम्रपट |
✒ अस्वलाचा खेळ करणारा | दरवेशी |
✒ दानधर्म करणारा | दाता |
✒ तिन्ही बाजुंनी पाणी असलेला प्रदेश | द्वीपकल्प |
✒ दररोज प्रसिद्ध होणारे वर्तमानपत्र | दैनिक |
✒ उंचावरून पडणारे पाणी | धबधबा |
✒ आकाशातून ऐकू येणारी वाणी | नभोवाणी |
✒ ईश्वर नाही असे मानणारा | नास्तिक |
✒ कुणाचाही आधार नसलेला | निराधार |
✒ खात्रीपूर्वक | निर्वाळा |
✒ कोणतेही व्यसन नसलेला | निर्व्यसनी |
✒ लिहता वाचता न येणारे | निरक्षर |
✒ दुसऱ्यावर अवलंबून असणारा | परावलंबी |
✒ पाणी मिळण्याची सोय | पाणपोई |
✒ आई वडील नाही असा | अनाथ |
✒ डोंगर पोखरून आरपार केलेला रस्ता | बोगदा |
✒ निरर्थक सांगितलेल्या गोष्टी | भाकडकथा |
✒ स्तुती करणारा | भाट |
✒ माकडाचा खेळ करून दाखवणारा | मदारी |
✒ दुसऱ्याच्या मनातील ओळखणारा | मनकवडा |
✒ स्वतःवर अवलंबून असणारा | स्वावलंबी |
✒ मरण पावलेल्याची आठवण राहावी म्हणून केलेली गोष्ट | स्मारक |
✒ दोन नद्या एकत्र मिळण्याची जागा | संगम |
✒ मागच्या काळाकडे ओझरती नजर टाकणे | सिंहावलोकन |
✒ भाषण करण्यासाठी उंचावरील जागा | व्यासपीठ |
✒ पती मरण पावला आहे अशी स्री | विधवा |
✒ लग्न झालेल्या मुलीच्या आई बापाचे घर | माहेर |
✒ जमिनीवर सतत पाणी साठल्याने झालेला चिखल | दलदल |
✒ गोळा करण्याची प्रक्रिया | संकलन |
✒ एखादे काम करण्याचा निश्चय | संकल्प |
✒ कष्टाशिवाय सहज मिळणारे | सुलभ |
✒ येणाऱ्या जाणाऱ्या माणसांची सतत गर्दी | वर्दळ |
✒ चूक लक्षात आल्यावर गप्प बसने | वरमणे |
✒ एखादे काम करण्यास धाडसाने पुढे येणे | धजणे |
✒ झाडांची निगा राखणारा | माळी |
✒ हाताच्या बोटात घालायचा दागिना | अंगठी |
• नक्की वाचा
समानार्थी शब्द
वीरुद्दार्थी शब्द
आशा करतो कि वरील दिलेल्या माहितीने आपण संतुष्ट असाल व Mpsc Exam मध्ये याचा आपल्यला खूप उपयोग याच प्रमाणे mpsc question पेपर मध्ये विचारले जाणारे काही Samanarthi Shabd व Virudharthi Shabd, Vakprachar आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे ते ही तुम्ही अभ्यासु शकता.
वर दिलेले Shabd Samuha baddal Shabd mpsc previous year Question Paper मध्ये वारंवार रिपीट झाले आहेत तर ते लक्षात राहावे म्हणून पुन्हा पुन्हा अभ्यासा व आपल्या मित्र मैत्रिणींना जे Mpsc exam ची तयारी करत आहेत त्याच्या सोबत ही पोस्ट share करा.