---Advertisement---

Shabd Samuha baddal Shabd l शब्द समूहाबद्दल एक शब्द

Shabd Samuha baddal Shabd

---Advertisement---

Job Details

Post Name

Qualification

Age Limit

Exam Date

Last Apply Date

Salary

शब्द समूहाबद्दल एक शब्द (Shabd Samuha baddal Shabd One word substitution in marathi) शब्द समूहाबद्दल एक शब्द हा घटक आपण शालेय अभ्यासक्रमा पासून शिकत आलो आहे. स्पर्धापरीक्षा (Mpsc, Combine, सरळसेवा) मध्ये देखील महत्वाचा असा घटक आहे या घटकावर आयोग प्रश्न विचारात असते.आपण असेच काही महत्वाचे शब्द पाहणार आहोत.

शब्द समूहाबद्दल एक शब्द म्हणजे काय ? अनेक शब्दांचा मिळुन शब्दसमूह बनत असतो याच शब्द समूहाबद्दल त्याच अर्थाचा एक शब्द वापरणे म्हणजे शब्द समूहाबद्दल एक शब्द होय.

Shabd Samuha baddal Shabd - शब्दसमूहाबद्दल एक शब्द मराठी 400

Marathi grammar shabd samuha baddal ake shabd

शब्दसमूहएकशब्द
✒ काम चांगले करता न येणाराअकुशल
✒ नाश न पावणाराअजरामर
✒ न जिंकता येणाराअजिंक्य
✒ बरोबरी करू न शकणारअजोड
✒ अंड्यात वाढ होऊन जन्म घेणारा सजीव प्राणीअंडज
✒ आत समावेश असलेलाअंतर्भूत
✒ बऱ्याच जाडीच्या आवरणाचा भेद करून जाणाराअतिवेधी
✒ ज्याची तुलना कशाशीही होत नाही असाअतुलनीय
✒ पायात बूट वगैरे काहीही नसलेलाअनवाणी
✒ पेशींचे विविध घटकात विघटनअपचयी
✒ नियमास धरून नसलेलेअपवाद
✒ प्रकाश पलीकडे जाऊ न देणाराअपारदर्शक
✒ विकास न झालेलाअप्रगत
✒ पाण्यात जन्मलेले कमळअंबुज
✒ मापता मोजता न येणारेअमाप
✒ विपुल पिकणाऱ्या चांगल्या फळभाज्यांच्या मळाअमृतमळा
✒ ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही असाअनुपम
✒ ज्याची किंमत होऊ शकत नाही असेअनमोल
✒ खूप दिवस पाऊस न पडणेअनावृष्टी
✒ नाश न पावणारेअविनाशी
✒ मुद्दाम पणे पसरवलेली खोटी बातमीअफवा
✒ मरण नाही असाअमर
✒ पंच्याहत्तरावा वाढदिवस उत्सवअमृत महोत्सव
✒ थोडक्यात समाधानी असलेलाअल्पसंतुष्ट
✒ डोक्यापासून पायापर्यंतआपादमस्तक
✒ अगदी पूर्वी पासून राहणारेआदिवासी
✒ ईश्वरावर विश्वास ठेवणारा आस्तिक
✒ दुसऱ्याच्या ताब्यात असलेलाअंकित
✒ लेखी स्वरूपात नसलेलेअलिखित
✒ पाऊस खूपच कमी पडणेअवर्षण
✒ राज्यकारभार करण्यासाठी नेमण्यात आलेले आठ प्रधानअष्टप्रधान
✒ कोणतीही अपेक्षा न बाळगता असक्त
✒ ज्याला मदत मिळत नाही असा असहाय
✒ सहन करण्यास कठीणअसह्य
✒ कोणालाही शारीरिक किंवा मानसिक इजा न करणेअहिंसा
✒ स्वतःचे स्वतः लिहलेले चरित्रआत्मचरित्र
✒ वेगवेगळे पदार्थ एकत्र काही वेळ भिजत घालणेआंबोण
✒ राखून ठेवणेआरक्षण
✒ स्पष्ट करून दाखवणेआविष्कार
✒ एखादी कला अंगी असणेकलाकार
✒ कविता रचणाराकवयित्री
✒ कानास गोड लागणारेकर्णमधुर
✒ सर्व ईच्छा पूर्ण करणारा वृक्षकल्पवृक्ष
✒ कठोर शब्दात केलेला उपदेशकानउघडणी
✒ आपल्या मताचा आग्रह न धरणेउदारमतवादी
✒ ग्रहाभोवती कक्षेत फिरणारा लहान ग्रहउपग्रह
✒ अतिशय उग्र विचाराचाकट्टर
✒ साधू लोकांचा लांब अंगरखाकफनी
✒ कठोर मनाचाकरडा
✒ जेथे मुख्य काम केले जाते ते ठिकाणकर्मभूमी
✒ फटीतून पडलेले प्रकाशाचे किरणकवडसा
✒ कष्टाला टिकून राहणारकाटक
✒ उलट बदल, परावर्तनकलाटणी
✒ फिरण्याचा मार्ग, मर्यादाकक्षा
✒ कृती घडवून आणणारा घटककारक
✒ काम करण्याची निश्चित पद्धतकार्यप्रणाली
✒ एखादी गोष्ट अमलात आणणेकार्यवाही
✒ शेती हाच मुख्य व्यवसाय असलेलाकृषिप्रधान
✒ दगडी कोळशापासून मिळणारा जळाऊ पदार्थकोक
✒ फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली जमीनकोरडवाहू
✒ घोड्यावर बसण्यासाठी चामड्याचे केलेले आसनखोगीर
✒ व्यक्तींचा ठराविक पोशाखगणवेश
✒ जमिनीवर मऊ मातीचा थर देऊन तयार केलेला वाफागादीवाफा
✒ लोकरीचे नक्षीदार आसनगालिचा
✒ शत्रूला समजणार नाही अश्या रीतीने त्यांची सर्व माहिती मिळवणारागुप्तहेर
✒ शेणापासून मिळणारा जळणाचा वायूगोबरगॅस
✒ कामासाठी विकत घेतलेले मनुष्य गुलाम
✒ धान्य साठवण्यासाठी बंदिस्त जागागोदाम
✒ नेहमी घरात बसून राहणारघरकोंबडा
✒ चार रस्ते मिळते ती जागाचौक
✒ सैन्याच्या तात्पुरती मुक्कामाची जागाछावणी
✒ निरनिराळे लोहमार्ग जेथे एकत्र येतात असे मोठे स्टेशनजंक्शन
✒ एखादी गोष्ट सर्वात आधी सुरु करणाराजनक
✒ पाण्यात राहणारे जलचर
✒ तप करण्याची जागातपोवन
✒ घोडा बांधण्याची जागातबेला
✒ शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्जतगाई
✒ तांब्याच्या पत्र्यावर लिहलेले लेखताम्रपट
✒ अस्वलाचा खेळ करणारादरवेशी
✒ दानधर्म करणारादाता
✒ तिन्ही बाजुंनी पाणी असलेला प्रदेशद्वीपकल्प
✒ दररोज प्रसिद्ध होणारे वर्तमानपत्रदैनिक
✒ उंचावरून पडणारे पाणीधबधबा
✒ आकाशातून ऐकू येणारी वाणीनभोवाणी
✒ ईश्वर नाही असे मानणारानास्तिक
✒ कुणाचाही आधार नसलेलानिराधार
✒ खात्रीपूर्वकनिर्वाळा
✒ कोणतेही व्यसन नसलेलानिर्व्यसनी
✒ लिहता वाचता न येणारेनिरक्षर
✒ दुसऱ्यावर अवलंबून असणारापरावलंबी
✒ पाणी मिळण्याची सोयपाणपोई
✒ आई वडील नाही असाअनाथ
✒ डोंगर पोखरून आरपार केलेला रस्ताबोगदा
✒ निरर्थक सांगितलेल्या गोष्टीभाकडकथा
✒ स्तुती करणाराभाट
✒ माकडाचा खेळ करून दाखवणारामदारी
✒ दुसऱ्याच्या मनातील ओळखणारामनकवडा
✒ स्वतःवर अवलंबून असणारास्वावलंबी
✒ मरण पावलेल्याची आठवण राहावी म्हणून केलेली गोष्टस्मारक
✒ दोन नद्या एकत्र मिळण्याची जागासंगम
✒ मागच्या काळाकडे ओझरती नजर टाकणेसिंहावलोकन
✒ भाषण करण्यासाठी उंचावरील जागाव्यासपीठ
✒ पती मरण पावला आहे अशी स्रीविधवा
✒ लग्न झालेल्या मुलीच्या आई बापाचे घरमाहेर
✒ जमिनीवर सतत पाणी साठल्याने झालेला चिखलदलदल
✒ गोळा करण्याची प्रक्रियासंकलन
✒ एखादे काम करण्याचा निश्चयसंकल्प
✒ कष्टाशिवाय सहज मिळणारेसुलभ
✒ येणाऱ्या जाणाऱ्या माणसांची सतत गर्दीवर्दळ
✒ चूक लक्षात आल्यावर गप्प बसनेवरमणे
✒ एखादे काम करण्यास धाडसाने पुढे येणेधजणे
✒ झाडांची निगा राखणारामाळी
✒ हाताच्या बोटात घालायचा दागिनाअंगठी

आशा करतो कि वरील दिलेल्या माहितीने आपण संतुष्ट असाल व Mpsc Exam मध्ये याचा आपल्यला खूप उपयोग याच प्रमाणे mpsc question पेपर मध्ये विचारले जाणारे काही Samanarthi Shabd व Virudharthi Shabd, Vakprachar आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे ते ही तुम्ही अभ्यासु शकता.
वर दिलेले Shabd Samuha baddal Shabd mpsc previous year Question Paper मध्ये वारंवार रिपीट झाले आहेत तर ते लक्षात राहावे म्हणून पुन्हा पुन्हा अभ्यासा व आपल्या मित्र मैत्रिणींना जे Mpsc exam ची तयारी करत आहेत त्याच्या सोबत ही  पोस्ट share करा.

naukrininja.com

नमस्कार मित्रहो Naukrininja.cpm या आपल्या website वर आपले मनःपूर्वक स्वागत आहे. मी गेली ४ वर्ष स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहे.मला अभ्यास करताना ज्या अडचणी आल्या त्या अडचणी गरजु व ग्रामीण भागातील विद्यार्थांना येऊ नये म्हणून या website ची स्थापना केली.या वेबसाईट वर तुम्हाला स्पर्धा परीक्षा नवीन जाहिरात updates, काही महत्वाचे मराठी व्याकरण,स्पर्धा परीक्षा निकाल अश्या काही महत्वाच्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करत आहे.सदर website वरील माहिती विविध online,offline, तसेच स्वतःच्या अभ्यासा वरून घेतली अथवा पुरवली जाते.आपल्या सर्वांचे सहकार्य नेहमी सोबत ठेवाल ही विनंती

Related Job Posts

Leave a Comment