Christmas Essay in Marathi: क्रिसमस (नाताळ) मराठी निबंध.आज क्रिसमस चा सण फक्त ख्रिस्ती देश नव्हे तर संपूर्ण जगात साजरा केला जात आहे. क्रिसमस ला मराठी भाषेत नाताळ म्हटले जाते.आजच्या या लेखात आपण नाताळ सणावरील “नाताळ निबंध मराठी” ( Christmas Essay in Marathi ) पाहणार आहोत.
नाताळ सण काय आहे?
क्रिसमस(Christmas) किंवा नाताळ ख्रिश्चन धर्मियांचा एक प्रसिद्ध सण आहे. हा सण जगभरात येशू ख्रिस्त यांचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. येशू ख्रिस्त यांना ख्रिस्त धर्माचे जनक मानले जाते. क्रिसमस सणाच्या दिवशी लोक चर्च मध्ये जाऊन मेणबत्त्या पेटवतात व प्रार्थना करतात. याशिवाय घरे व आजूबाजूचा परिसर सुंदर रोषणाई करून सजवला जात असतो. अशा पद्धतीने क्रिसमस सण साजरा केला जातो.
Christmas Essay in Marathi नाताळ किंवा क्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी २५ डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो
ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण १२ दिवसांच्या ‘ख्रिसमस्टाईड’ नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळच्या पोप पहिला ज्युलियसने ‘२५ डिसेंबर’ हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. त्या वेळेपासून नाताळ हा दिवस २५ डिसेंबर या तारखेला साजरा केला जाऊ लागला. जगाच्या बऱ्याच मोठ्या भागात हा सण मध्यरात्री साजरा केला जातो, तर काही ख्रिश्चन अनुयायी व काही ख्रिस्ती पंथ मात्र सायंकाळी हा सण साजरा करतात. भगवान येशूंच्या जन्माची सुवार्ता विशद करणाऱ्या मॅथ्यू आणि ल्यूक यांच्या ज्या कथा आहेत त्यामध्ये तसेच प्राचीन ख्रिस्ती लेखकांनी सुचविलेल्या तारखांमध्ये काही तफावत दिसून येते. सर्वात प्रथम इ.स.पू. ३३६ मध्ये रोम येथे ख्रिसमस हा सण साजरा झाला असे मानले जाते.
ख्रिसमस किंवा नाताळ हा सण दरवर्षी 25 डिसेंबर ला साजरा केला जातो. याच दिवशी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला होता. ख्रिसमस हा ख्रिस्ती धर्माचा प्रमुख सण आहे. पण आजकाल ख्रिस्ती धर्मासोबतच भारतात हिंदू व अन्य धर्माचे लोक देखील या सणाला साजरा करतात. भारतात ख्रिसमस सणांची प्रमुखता वाढत आहे. येशू ख्रिस्त उच नीच व भेदभाव मानत नसतं. त्यांनी जगभरातील लोकांना प्रेम आणि एकतेने राहण्याचा संदेश दिला. ख्रिसमस सणाच्या पाच दिवसानंतर नवीन वर्ष सुरू होते. या मुळे जगभरात डिसेंबर महिन्याच्या शेवटचे 10 दिवस उत्साह आणि आनंदाने भरलेले असतात.ख्रिसमस ख्रिस्ती धर्मीयांचा सर्वात मोठा सण आहे, ज्याला थंडीच्या दिवसात साजरे केले जाते. या दिवशी सर्व सरकारी शाळा, कॉलेज, ऑफिस बंद राहतात. ख्रिसमस सणाला लोक उत्साहाने साजरा करतात या दिवशी घर व दुकाने सजवल्या जातात. ख्रिसमस च्या काही दिवस आधीच लोक आपल्या घरांना वेगवेगळ्या रंगाच्या लाईटिंग ने सजवतात. बाजारात क्रिसमस ट्री, केक, संताक्लॉज चे लाल आणि पांढऱ्या रंगाचे कपडे, गिफ्ट इत्यादी वस्तू मिळायला लागतात.25 डिसेंबर क्रिसमस डे च्या दिवशी लोक चर्च मध्ये जाऊन मेणबत्त्या पेटवतात आणि प्रार्थना करून परमेश्वर येशू ख्रिस्तांना आठवण करतात. या दिवशी लोक आपल्या घरात क्रिसमस ट्री सजवतात आणि एक दुसऱ्याला केक खाऊ घालून शुभेच्छा देतात.
भेटवस्तू देण्याची प्रथा
भगवान येशूंच्या जन्माचा स्मरणउत्सव साजरा करण्याचा विविध प्रथा–पद्धती स्वतंत्रपणे विकसित झाल्याचे दिसून येते. या प्रथांना येशूजन्मपूर्व काळातील साजरा होणाऱ्या पगान संस्कृतीच्या शीतकाळातील अयनदिवसांच्या उत्सव साजरे करण्याचे संदर्भ जोडलेले दिसतात. पगान जमातीने कालांतराने ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला. भेटवस्तूंची देवाणघेवाण हा त्यातीलच एक भाग.
नाताळ सणामध्ये भेटवस्तू देण्याची प्रथा अत्यंत महत्त्वाची आहे. विशेषतः लहान मुलांना या सणाची खूप हौस असते. महाराष्ट्रातील ख्रिस्ती लोक दिवाळीप्रमाणे या दिवशी करंज्या व अन्य खाद्यपदार्थांचे एकमेकांस आदान-प्रदान करतात. लहान मुलांना सांताक्लॉजच्या वेषात येऊन भेटवस्तू देण्यात येतात.
ख्रिसमस ट्री
नाताळचा सूचिपर्णी वृक्ष हा पगान संस्कृतीचा वृक्षपूजेचा एक भाग मानला जातो. त्याचा संबंध हिवाळ्यातील संक्रमणाशी आहे. ख्रिसमस ट्री असे संबोधन प्रथम इ.स. १८३५ मध्ये झालेले आढळते. आधुनिक काळातील या वृक्षाची सजावट हा भाग जर्मनीत उदय पावल्याचे समजतात. हे वृक्ष दिव्यांच्या माळा आणि अन्य सजावट साहित्यांनी सुशोभित केले जातात. लहान मुलांचे मोजे, छोट्या प्रतीकात्मक काठ्या, छोट्या घंटा, भेटवस्तू अशा गोष्टी लावून हा वृक्ष सजवितात. काही ठिकाणी विशेषतः प्रार्थनास्थळी येशूच्या जन्माचा देखावा मांडला जातो.
नाताळबाबा (सांताक्लॉज)
साताक्लॉज किंवा संत निकोलस हे नाताळ सणाचे प्रमुख वैशिष्ट्य होय. सांताक्लॉज ही एक काल्पनिक व्यक्तिरेखा असून त्याला मराठीत नाताळबाबा असे म्हणतात. पाश्चिमात्य ख्रिश्चन संस्कृतीत मानले जाते की चांगली वर्तणूक असलेल्या लहान मुलांना नाताळच्या आदल्या रात्री सांताक्लॉज भेटवस्तू देऊन जातात.
सांताक्लाॅजचे चित्रण सामान्यतः बुटकी, वृद्ध, पांढऱ्या दाढीची, लाल अंगरखा घातलेली, चष्मा लावलेली व्यक्ती असे केले जाते. लहान मुलांसाठी भरपूर भेटवस्तू भरलेली एक मोठी पिशवीही याच्यासोबत असते. अमेरिका आणि कॅनडा या देशांत ही व्यक्तिरेखा १९व्या शतकापासून विशेष लोकप्रिय आहे.
नाताळ हा सण आफ्रिका, आग्नेय आशिया, युरोप, अमेरिका अशा जगभरातील सर्व खंडांमध्ये व विविध देशांमध्ये अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. बर्फ पडत असलेल्या प्रदेशात शुभ्र नाताळ (White Christmas) उत्साहाने साजरा होतो. लहान मुले आवर्जून बर्फाचे तात्पुरते बाहुले तयार करतात. त्यांना (Snowman) स्नो-मन म्हणले जाते.
नाताळला भारतातील प्रत्येक चर्चमध्ये सकाळची प्रार्थना होते. या दिवशी चर्चमध्ये नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात गर्दी असते. प्रत्येक पुरुष, स्त्री, लहान मुले नवीन कपडे घालून खूप उत्साहात चर्चमध्ये येतात. भारतामध्ये ख्रिश्चन अल्पसंख्याक असून त्यांची लोकसंख्या अवघी २.३% (१.२४ कोटी) आहे. तरी नाताळला भारतात ही सार्वजनिक सुट्टी असते. ख्रिस्ती मिशनरी चालविणाऱ्या ख्रिस्ती शाळांमध्ये अनेक मुले सक्रियपणे ख्रिसमस कार्यक्रमात सहभागी होतात. तसेच अनेक ख्रिस्ती नसलेल्या वा खाजगी व सरकारी शाळांमध्ये व हिंदू घरांमध्येही ख्रिसमस साजरा केला जातो.
ख्रिसमसचा सण संपूर्ण जगात अतिशय उत्साहाने साजरा होतो. जगातील ज्या ज्या देशात ख्रिश्चन धर्माचे लोक राहतात तिथे हा सण साजरा केला जातो. या दिवशी ख्रिश्चन धर्मीय लोक चर्चमध्ये जातात व येशू परमेश्वराला प्रार्थना करतात. येशू ख्रिस्त मानवजातीसाठी सुळीवर लटकले होते. पण या नंतर ते परत एकदा जिवंत झाले. व लोकांना प्रेम आणि क्षमा शिकवली. ज्या लोकांनी त्यांना सुळीवर चढविले होते त्यांना देखील येशूंनी क्षमा केली. येशू ख्रिस्ताच्या चमत्कारांच्या कथा पवित्र ग्रंथ बायबल मध्ये सांगितल्या गेल्या आहेत.
ख्रिसमसचा सण आनंद साजरा करण्यासाठी असतो. या दिवसाची तयारी करीत आधीपासूनच घराची साफसफाई केली जाते. घरात नवीन फर्निचर विकत घेतले जाते. ख्रिसमस च्या दिवशी घालण्यासाठी नवीन कपडे विकत आणले जातात. Christmas Essay in Marathi दुकानात केक आणि मिठाई साठी ऑर्डर दिल्या जातात. घरात अतिथी पाहुण्यांचे आगमन सुरू होते. बाजार नववधू सारखे सजून गेलेले असतात. डिसेंबरमध्ये कडाक्याची थंडी पडलेली असते तरीही लोक उत्साहाने हा सण साजरा करतात.
See Also – नूतन वर्ष / नवीन वर्ष मराठी निबंध l हॅप्पी न्यू ईयर 2025 मराठी | Happy New Year Essay in Marathi
ख्रिसमसच्या दिवशी घरात सकाळपासूनच तयारी सुरु होते. आंघोळ करून चर्चमध्ये जाण्याची तयारी सुरू होते. चर्चला देखील या दिवशी सजवले जाते तिथं मेणबत्त्या लावून येशू ख्रिस्ताचा समोर प्रार्थना केली जाते. चर्चमधील पाध्री विधिवत पूजा व अनुष्ठान करतात. काही काही ठिकाणी धार्मिक प्रवचन पण दिले जातात.