---Advertisement---

Alankar in Marathi I मराठी अलंकार व प्रकार I मराठी अलंकार

Alankar in Marathi I मराठी अलंकार व प्रकार I मराठी अलंकार

---Advertisement---

Job Details

Post Name

Qualification

Age Limit

Exam Date

Last Apply Date

Salary

Alankar in Marathi I मराठी अलंकार व प्रकार I मराठी अलंकार अलंकार म्हणजे काय? भाषेला सुंदर,आकर्षक आणि प्रभावी बनवण्यासाठी वापरले जाणारे शब्द किंवा अर्थातील सौंदर्य म्हणजे अलंकार. अलंकार = भाषेची शोभा वाढवणारे साधन

भाषेचे अलंकार म्हणजे काय?

कोणत्या भाषेचे सोंदर्य वाढविण्यासाठी जे तंत्र वापरले जाते त्याला ‘भाषेचे अलंकार’असे म्हणतात.

Marathi Alankar मराठी अलंकार व प्रकार

मराठी अलंकारांचे प्रकार : (Marathi Alankar Types)

  1. शब्दालंकार
  2. अर्थालंकार

शब्दालंकार 

अनेकदा शब्दांच्या विशिष्ट रचनेमुळे काव्यात किंवा शद्बरचनेत सौंदर्य निर्माण होत असते. अशा अलंकारांना शब्दालंकार असे म्हणतात

शब्दालंकाराचे प्रकार

1.अनुप्रास अलंकार

एख्यादा  वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती  होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो

उदाहरण

पोटापुरता पसा पहिजे नको पिकाया पोळी
देणा-याचे हात हजारो दुबळी माझी झोळी
या वाक्यात प , ह आणि  ही अक्षरे पुन:पुन्हा आल्यामुळे जो नाद निर्माण होतो, त्यामुळे या काव्यपंतीला शोभा आली आहे.

2.यमक अलंकार

कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठरविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे
वेगळ्या अर्थाने आल्यास यमक हा अलंकार होतो.

उदाहरण

मना चंदनाचे परी त्वा झिजावे |
परी अंतरी सज्जना नीववावे ||
या वैभवाला तुझ्या पाहुनिया, मला स्फूर्ति नृत्यार्थ होते जरी |
सामर्थ्य नामी तुझ्या जन्मभूमी, तसे पहिले मी न कोठे तरी |
अशा शब्दांनी नादमाधुर्य निर्माण झालेल्या पद्यपंक्ती तुमच्या पाठ्यपुस्तकातील कवितांतून निवडून काढा.

3.श्लेष अलंकार

 एकच शब्द वाक्यात दोन अर्थानी वापरल्यामुळे जेव्हा शब्दचमत्कृती निर्माण होते तेव्हा ‘श्लेष’ हा अलंकार होतो.

उदाहरण

सुनील : काय करतोस
आनिल : काय नाही, पडलोय
सुनील : पडलास ? लागलं का मग ?
श्लेष म्हणजे आलिंगन किंवा मिठी  एकाच शब्दाला दोन अर्थांची मिठी बसलेली असते, म्हणजे दोन अर्थ चिकटलेले असतात.त्यामुळे एका शब्दाचे दोन अर्थ निघतात श्लेष हा शब्दालंकार आहे व अर्थालंकार देखील आहे.

Alankar in Marathi I मराठी अलंकार व प्रकार I मराठी अलंकार

अर्थालंकार

आता आपण ‘अर्थालंकारांचा’ अभ्यास करूया. अनेकदा शब्दांच्या अर्थामुळे काव्यात किंवा गद्यरचनेत सौंदर्य निर्माण होत असते अर्थालंकाराच्या संदर्भात आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की आपल्याला जे सांगावयाचे आहे ते प्रभावी रीतीने सांगण्यासाठी त्यासारख्याच दुसऱ्या गोष्टीची आपण मदत घेतो.त्याची तुलना करतो.

उदा.
       ‘सुरेशचे अक्षर चांगले आहे’ हे आपल्याला सांगावयाचे आहे. म्हणून आपण अक्षरांची तुलना मोत्याशी ‘ करतो. आणि वाक्य तयार करतो. ‘सुरेशचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे’. येथे ‘अक्षर’ व ‘मोती’ यांच्यातील साम्य आपल्यासमोर येते.

आणखी काही उदाहरणे :

  1. शाळा मातेप्रमाणे आहे.
  2. आमच्या गावातील पाटील हे कर्णासारखे दानशूर आहेत.
  3. आमच्या वर्गातील समीर प्रा.शिवाजीराव भोसले यांच्यासारखा चांगला वक्ता आहे.

वरील वाक्यांसारखी वाक्ये तयार करताना त्यात सहजपणा आहे.त्याचप्रमाणे आपल्याला जे सांगावयाचे आहे. ते परिणामकारकपणे, सुंदर रीतीने सांगावे अशी भावना आहे. अलंकाराच्या संदर्भातील महत्त्वाचे शब्द, किंवा अलंकारात येणारे घटक पुढीलप्रमाणे असतात (अर्थात ते सर्वच अलंकारात असतात असे नव्हे).

  • उपमेय – ज्याची तुलना करावयाची आहे, ते किंवा ज्याचे वर्णन करावयाचे आहे, तो घटक
  • उपमान – ज्याच्याशी तुलना करावयाची आहे किंवा ज्याची उपमा दिली जाते तो घटक
  • साधारणधर्म – दोन वस्तूंत असणारा सारखेपणा किंवा दोन वस्तूंत असणारा समान गुणधर्म
  • साम्यवाचक शब्द – वरील सारखेपणा दाखविण्यासाठी वापरला जाणारा शब्द.

वरील घटकांचा अर्थ समजून घेण्यासाठी वरीलपैकी एक वाक्य उदाहरण म्हणून घेऊ.

सुरेशचे अक्षर मोत्यांप्रमाणे सुंदर आहे’.

वरील वाक्यात

सुरेशचे अक्षर हे उपमेय आहे.

सुरेशच्या अक्षरांची तुलना ‘मोत्यांशी’ केली आहे. ‘मोती’ हे उपमान आहे.

या लेखात आपण अर्थालंकारांपैकी चार महत्वाचे अलंकार – रूपक,व्यतिरेक,दृष्टांत व चेतनगुणोक्ती – यांचा सविस्तर अभ्यास करूया.

उमपा अलंकार 

दोन वस्तूंतील साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने जेथे दाखविलेले असते, तेथे उपमा हा अलंकार होतो.  उपमेत एक वस्तू दुस-यासारखी आहे असे वर्णन असते

उदाहरण

1) मुंबईची घरे मात्र लहान…. कबुतराच्या खुराड्यासारखी ….
2) सावळाच रंग तुझा पावसळि नभापरी
3) आभाळागत माया तुझी आम्हांवरी राहू दे

सामान्यत: उपमा अलंकारात सारखा , जसा, जेवि, सम, सदðश, गत, परी, समान
यांसारखे साम्यवाचक शब्द येतात.

1.रूपक

पुढील पद्यपंक्ती किंवा वाक्ये पाहा:

  1.  बाई काय सांगो । स्वामीची ती दृष्टी।
    अमृताची वृष्टी । मज होय ।।
  2. ऊठ पुरुषोत्तमा । वाट पाहे रमा ।
    दावि मुखचंद्रमा । सकळिकांसी ।।
  3. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. आकार द्यावा तशी मूर्ती घडते.

यांतील पहिल्या उदाहरणात स्वामीची दृष्टी व अमृताची वृष्टी ही दोन्ही एकरूपच मानलीआहेत.

दुसऱ्या वाक्यातील उपमेय (मुख) व उपमान (चंद्र) ही एकरूप मान्न ‘मुखचंद्रमा’ असा शब्दप्रयोग केला आहे.

 तिसंऱ्या वाक्यात लहान मूल हे मातीच्या गोळ्या सारखे आहे. 

त्यांच्यातील असे नुसते उपमेय व उपमान यांतील केवळ सादृश्य न दाखविता अभेद वर्णिलेला आहे. अशा प्रकारे उपमेय व उपमान यांत एकरूपता ती भिन्न नाहीत असे वर्णन जेथे असते तेथे रूपक हा अलंकार असतो.

रूपक अलंकारात एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीच्या रुपात किंवा स्वरूपात दाखवली जाते. त्यामध्ये दोन भिन्न गोष्टीत साम्य साधले जाते आणि त्याना एकरूप करून वर्णन केले जाते यामुळे काव्यात सौदर्य निर्माण होते.

  • परिभाषा: जेव्हा वाक्यात उपमेय व उपमान यांत एकरूपता आहे.ती भिन्न नाहीत असे वर्णन केले जाते तेव्हा रूपक अलंकार होतो.

उदाहरण

  • लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. आकार द्यावा तशी मूर्ती घडते.

2.उत्प्रेक्षा

उपमेय हे उपमानच आहे असे जेथे वर्णन असते, तेथे ‘उत्प्रेक्षा’ हा अलंकार असतो.
उत्प्रेक्षा अलंकारात जणू, जणूकाही, जणूकाय, की, गमे, वाटे, भासे, म्हणजे यांपैकी एखादा साधर्म्यसूचक शब्द असतो.

  1. विद्या हे पुरुषास रूप बरवे, की झाकले द्रव्यही
  2. तिच्या कळ्या | होत्या मिटलेल्या सगळ्या |
    जणू दमल्या | फार खेळूनी, मग निजल्या ||

Alankar in Marathi

3.व्यतिरेक

या प्रकारच्या अलंकारामध्ये उपमेय हे उपमानापेक्षा सरस असल्याचे वर्णन केलेले असते.
उदा.

  1. अमृताहुनीही गोड नाम तुझे देवा
  2. तू माउलीहुनी मायाळ | चंद्राहूनी शीतळ
    पाणियाहूनी पातळ | कल्लोळ प्रेमाचा

4.अतिशयोक्ती

कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते त्यावेळी हा अलंकार होतो.
उदा.

  1. दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं न्हाण झालं ||
    मामंजीची दाढी झाली, भावोजींची शेंडी झाली ||
    उरलेलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला |
    वेशीपर्यंत ओघळ गेला त्यात उंट पोहून गेला ||

5.दृष्टान्त

एखादे तत्त्व, एखादी गोष्ट किंवा कल्पना पटवून देण्यासाठी तसाच एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास ‘दृष्टान्त’ अलंकार होतो.
उदा.

  1. लहानपण देगा देवा | मुंगी साखरेचा रवा |
    ऐरावत रत्न थोर | त्यासी अंकुशाचा मार ||तुकाराम महाराज परमेश्वराकडे लहानपण मागतात ते कशासाठी हे पटवून देताना मुंगी होऊन साखर मिळते आणि ऐश्वर्यसंप ऐरावत होऊन अंकुशाचा मार खावा लागतो अशी उदाहरणे देतात.

6.स्वभावोक्ती

एखाद्या व्यक्तीचे, वस्तूचे, प्राण्याचे, त्याच्या स्वाभाविक हालचालींचे यथार्थ वैशिष्ट्यपूर्ण वर्णन करणे हा या भाषेचा अलंकार ठरतो तेव्हा ‘स्वभावोक्ती’ अलंकार होतो.
उदा.

  • उदाहरण १ (लहान मुलाचे वर्णन):
    “पोटी पोर, हाती ताट,
    बाहेर सडे सांडून,
    आल्या घरच्या उंबरठ्यावर,
    हसून बोलले.”
    (स्पष्टीकरण: येथे एका गृहिणीचे सामान्य दृश्य हुबेहूब मांडले आहे.)
  • उदाहरण २ (प्राण्याचे वर्णन):
    “कुणी एके काळी, एका जंगलात,
    एक वाघ हिंडत होता,
    त्याच्या डोळ्यांत आग,
    आणि नखांत धार होती.”
    (स्पष्टीकरण: वाघाचे स्वाभाविक आणि हिंस्र स्वरूप स्पष्ट केले आहे.)
  • उदाहरण ३ (निसर्ग वर्णन):
    “थंडीने थरथरली,
    झाडे उभी राहिली,
    पानगळ झाली,
    आणि पानं सुकली.”
    (स्पष्टीकरण: निसर्गाचे वास्तव चित्र उभे केले आहे.)
  1. मातीत ते पसरले अति रम्य पंख |
    केले वरी उदर पांडुर निष्कलंक ||
    चंचू तशीच उघडी पद लांबविले |
    निष्प्राण देह पडला श्रमही निमाले ||

7.विरोधाभास

एखाद्या विधानाला वरवरचा विरोध दर्शविला जातो पण तो वास्तविक विरोध नसतो. तेव्हा विरोधाभास अलंकार होतो.
उदा.

  1. जरी आंधळी मी तुला पाहते.
  2. मरणात खरोखर जग जगते |

Alankar in Marathi I मराठी अलंकार व प्रकार I मराठी अलंकार

See Also…

8th Scholarship Question Paper Pdf Download I 8 वी स्कॉलरशिप परीक्षा प्रश्नपत्रिका Pdf I 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका Pdf

naukrininja.com

Related Job Posts

SBI Apprentice Recruitment 2026 Apply Online for 7150 Posts | SBI Bharti 2026

Job Post:

SBI Apprentice Recruitment 2026 Apply Online for 7150 Posts

Qualification:

Graduation in any stream

Job Salary:
Last Date to Apply:

15 June 2026

Apply Now

Bank of Baroda Apprentice Recruitment 2026 | BOB Apprentice Bharti 2026 Apply Online for 5000 Posts

Job Post:

Apprentice

Qualification:

Graduate

Job Salary:

50k+

Last Date to Apply:

08 June 2026

Apply Now

MSC Bank Bharti 2026: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 30 जागांसाठी भरती

Job Post:
Qualification:
Job Salary:
Last Date to Apply:
Apply Now

Silver Appreciation of Poem 9th Std | Silver Poem Appreciation in Marathi | Walter de la Mare

Job Post:
Qualification:
Job Salary:
Last Date to Apply:
Apply Now

Leave a Comment