Marathi Mhani मराठीतील म्हणी व त्यांचे अर्थ  

Marathi Mhani मराठी म्हणी

Marathi Mhani मराठी म्हणी व त्यांचे अर्थ आपण बोलतान लिहताना बऱ्याच म्हणी वापरात असतो, म्हणी मुळे आपल्या भाषेला सौंदर्य प्राप्त होते. शालेय जीवनापासून ते स्पर्धा परीक्षांमध्ये अतिशय महत्वाचा असा घटक Marathi Mhani मराठीतील म्हणी व त्यांचे अर्थ विचारले जातात.म्हणी म्हणजे पारंपारिक बोली भाषेतील वाक्य जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते.

Marathi Mhani Ani Aarth

Marathi Mhani मराठीतील म्हणी व त्यांचे अर्थ  

Marathi Mhani  म्हणी मराठी

अंगाचा तीळ पापड होणे – खूप राग येणे

अंगात नाही बाळ आणि चिमटा काढून पळ – दुर्बळ मनुष्य बलवान व्यक्तीवर समोरून हल्ला न करता छोटी खोडी काढून पसार होतो

अंथरूण पाहून पाय पसरावे – आपली आवक पाहून खर्च करावा

अंगा पेक्षा भोंगा मोठा – खऱ्या गोष्टी पेक्षा खोट्या गोष्टी जास्त महत्वाच्या

अंधारात चोरास बळ – अनुकूल परिस्थिती येताच माणसाचे बळ वाढते

अति तिथे माती – कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो

अतिशहाणा त्याचा बैल रिकामा – स्वतःला खूप शहाणा समजणार प्रत्यक्षात कृती करत नाही

अडला हरी गाढवाचे पाय धरी – अडचणीच्या वेळी मूर्ख लोकांचे पाय धरण्याची वेळ

अति राग भीक माग – रागीट मनुष्य आपलेच नुकसान करून घेतो

अहेर नारळाचा आणि गजर वाजंत्र्याचा – करणे थोडेसे पण गलबलाच फार

अर्धा वैद्य मरणा खाद्य – अर्धवट ज्ञान माणसाच्या विनाशास कारणीभूत ठरते

आई जेवू घालेन बाप भीक मागू देईना – दोन्हीकडून अडचणीत सापडणे

आईजीच्या जिवावर बाईजी उदार – दुसऱ्याचा पैसे हवा तास उधळणे

आईचा काळ बायकोचा मावळ – बायकोची काळजी घेणे परंतु आई ची नाही

आगीतुन उठून फुफाट्यात पडणे – एका संकटातुन वाचण्याच्या प्रयत्नात दुसऱ्या संकटात सापडणे

आधी पोटोबा मग विठोबा – आधी स्वार्थ मग देव धर्म

आधीच तारे त्यात शिरले वारे – आधीच वाईट परिस्थिती अजून वाईट होणे

आपला हात जगन्नाथ – आपली प्रगती आपल्या हातावर अवलंबून असते

आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कारटे – आपले आहे ते चांगल दुसऱ्याचे ते वाईट

आपल्याच पोळीवर तूप ओढणे – स्वार्थी प्रवृत्ती ने स्वतःचाच फायदा करून घेणे

आयत्या बिळावर नागोबा – दुसऱ्याचे श्रेय आपण घेऊ पाहणे

आयत्या पिठावर रांगोळी – दुसऱ्याच्या परिश्रमावर स्वतःचा फायदा करून घेणे

आले अंगावर तर घेतले शिंगावर – आलेल्या संधीचा फायदा करून घेणे

• इकडे आड तिकडे विहीर – दोन्ही बाजुंनी संकटात सापडणे

• ईच्छा तिथे मार्ग – कोणतीही गोष्ट करण्याची ईच्छा असेल तर मार्ग सापडतो

इनमीन साडेतीन – खूपच कमी प्रमाण असणे

उंदराला मांजर साक्ष – दिघेही दोषी व एकमेकांचे साक्षीदार

उंदीर मेला अन गाव गोळा झाला – शुल्लक गोष्टीचा गावगावच फार

उथळ पाण्याला खळखळाट फार – अज्ञानी फार बढाया मारतो

ओठात एक आणि पोटात एक – मनात वेगळे आणि बाहेर बोलणे वेगळे

एक घाव दोन तुकडे – झटपट निकाल लावावा,चर्चा करत बसू नये

एक न धड भाराभर चिंध्या – केवळ संख्येने जास्त असणे प्रत्यक्षात मात्र उपयोग न होणे

एकजूट त्यांना कधी न तूट – एकजुटीने राहिलेल्या काहीही कमी पडत नाही

एकटा जीव सदाशिव – एकट्या माणसाला कोणत्याही गोष्टी ची चिंता नसते

एका हाताने टाळी वाजत नाही – दोघांच्या भांडणात दोघांचा ही दोष असतो

एका खांबावर द्वारका – एकाच व्यक्तीवर संपूर्ण जबाबदारी असणे

ऐकावे जनाचे करावे मानाचे – सर्वांचा सल्ला घ्यावा परंतु आपल्याला योग्य वाटेल तेच करावे

करावे तसे भरावे – जसे चांगले वाईट कराल तसे भोगाल

करीन ती पूर्व – आपण म्हणेल तेच खरं

कामापुरता मामा – काम असेल तेव्हा गोड बोलणारा

काखेत कळसा अन गावाला वळसा – वस्तु जवळच असते परंतु गावभर शोधाशोध

कुंपणाने शेत खाल्ले – ज्याच्या हाती रक्षणाचे काम त्यानेच नुकसान करणे

कावळा बसायला फांदी तुटायला – बोलेल ती गोष्ट योगायोगाने घडुन जाणे

कोळसाला आला दर जाळून टाकले घर – तात्पुरत्या फायद्याचा विचार करुन नुकसान करुन घेणे

खऱ्याला मरण नसते – खरे कधीच लपत नाही

खायला काळ भुईला भार – निरुपयोगी असले असे

खाण तशी माती – जसे आई बाप तशीच मुले

खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी – असेल तेव्हा चैन करणे नाहीतर उपवास

खिशात नाही कावडी बदवली कोंबडी – आपली कुवत नसताना व्यवहार करणे

गर्वाचे घर खाली – गर्विष्ठ माणसाला अखेर लज्जित व्हावे लागते

गरज सरो वैद्य मरो – गरज असेल तो पर्यंत सोबत असणे

गळ्यातले तुटले ओटीत पडले – नुकसान होता होता टळणे

गाढवाला गुळाची चव काय – ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही त्याला त्याची किंमत कळत नाही

गोरा गोमटा कपाळ करंटा – दिसण्यात सुंदर पण नशिबाने दुर्दैवी

गोगलगाय अन पोटात पाय – वरुन छान दिसणारा मनातून कपटी असतो

चढेल तो पडेल – गर्विष्ठ माणसाचा गर्व उतरल्याशिवाय राहत नाही

चव ना ढव दडपून जेव – स्वयंपाकाला चव नसली तरी भरपूर जेवायला आग्रह करणे

चालत्या गाडीला खीळ – व्यवस्तीत चालणाऱ्या कार्यात अडचण निर्माण होणे

चोरावर मोर – एखाद्या गोष्टीत दुसऱ्यापेक्षा वरचढ असणे

चोर सोडून संन्याशाला फाशी – अपराधी सोडून निरापराधी ला शिक्षा

चोराच्या उलट्या बोंबा – स्वतः चूक करून दुसऱ्याच्या नावाने ओरडणे

जसे करावे तसे भरावे – जसे कर्म कराल तसे फळ मिळते

डाळ शिजत नाही आणि वरण उकळत नाही – कोणतीही गोष्ट साध्य होत नाही

डोंगर पोखरून उंदीर काढणे – खूप प्रयत्न करून थोडेसे यश मिळणे

ढेकूण मारायला तलवार नको – छोट्या कामासाठी मोठ्या तयारीची गरज नाही

तेरड्याचा रंग तीन दिवस – कोणत्याही गोष्टीचा नवे पणा थोडाच काळ राहतो

तीळ खाऊन व्रत मोडणे – छोट्याशा स्वार्थासाठी आपले आचरण बदलणे

दात आपले ओठ आपले – शिक्षा देणारा आणि शिक्षा सहन करणारा आपलाच मनुष्य

दुरुन डोंगर साजरे – दुरुन एखादी गोष्ट चांगली दिसते परंतु चांगली नसते

देव तरी त्याला कोण मारी – देवाची कृपा असल्यावर कोणी वाईट करू शकत नाही

नंदी आला घरा त्याचा आदर करा – पाहुणा जरी नको असला तरी त्याचे स्वागत करावे लागते

नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न – कठीण कामाला आणखी अडचणी निर्माण होणे

नव्याचे नऊ दिवस – नवीन गोष्टीचे थोडे दिवसच कुतूहल वाटते

पळसाला पाने तीनच – सगळीकडे सारखीच परिस्थिती

पदरी पडले पवित्र झाले – कोणतीही गोष्ट स्वीकारली असेल तर तिला नावे ठेवू नये

पालथ्या घड्यावर पाणी – व्यर्थ निष्फळ प्रयत्न

पायातली वाहन पायातच बरी – चुकीच्या माणसाला विशेष महत्व देऊ नये

पाची बोटे सारखी नसतात – प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो

पी हळद आणि हो गोरा – कोणत्याही कामाचे फळ पटकन मिळावे अशी इच्छा असणे

बडा घर पोकळ वासा – नाव मोठे मात्र लक्षण खोटे

बुडत्याला काडीचा आधार – संकटकाळी छोटीसी मदत फार महत्वाची असते

भोळ्याचे देव सोळा – भोळ्या मनुष्याचा प्रत्येकावर विश्वास असतो

भिंतीला कान असतात – कोणतीही गोष्ट लपून राहत नाही

मुलाचे पाय पाळण्यात दिसतात – लहान वयातच व्यक्तीचे चांगले गुणदोष दिसतात

रात्र थोडी सोंगे फार – कामे खूप परंतु वेळ कमी

संत तसा रंग – मनुष्याचा स्वभाव त्याच्या मित्रा प्रमाणे असतो

सापाला दुध पाजले तरी तो विषच ओकणार – दुष्टाला कितीही चांगले वागवले तरी दुष्टपणा जात नाही

सोनाराकडून कान टोचला म्हणजे दुखत नाही – योग्य व्यक्ती कडून केलेले काम चांगले असते

सेवा करील तो मेवा खाईल – कष्ट करेल त्याला चांगले फळ मिळेल

नावडतीचे मीठ आळणी – नावडत्या माणसाने केलेली गोष्ट आपल्यला आवडतच नाही

उतावळी बावरी म्हाताऱ्याची नवरी – उतावळेपणा मुळे नुकसान होते

उचलली जीभ लावली टाळ्याला – काहीही विचार न करता बोलणे

नाकापेक्षा मोती जड – मालकापेक्षा नोकराची प्रतीक्षा वाढणे

दिव्याखाली अंधार – कोणताही मनुष्य परिपूर्ण नसतो

दाम करी काम – पैश्यामुळे सर्व कामे होतात

निंदकाचे घर असावे शेजारी – निंदा करणाऱ्याचे घर शेजारी असेल तर प्रेरणा मिळते

आलिया भोगासी असावे सादर – संकटकाळाची तक्रार करत बसण्यापेक्षा परिस्थिती चा स्वीकार करावा

आपली पाठ आपल्याला दिसत नाही – आपल्या स्वतःची चूक आपल्यला दिसत नाही

धनाची करी माया उडत्या पाखराची छाया – आजची श्रीमंती उद्या असेलच असे नाही

जशी देणावळ तशी धुणावळ – आपण दुसऱ्याच्या उपयोगी पडत असेल तर दुसरेही आपल्या उपयोगी पडतात

जन्मा आला हेला पाणी वाहत मेला – अडाणी माणसाचे आयुष्य कष्ट करण्यात जाते

घरोघरी मातीच्या चुली – जिकडे तिकडे सारखीच परिस्थिती

रिकामा डौल आणि घराला नाही कौल – पोकळ बडेजाव दाखवणे

राजाच्या कारभाराला पोटाचा दरारा – पोट भारण्यासाठीच राजाची नोकरी करावी लागते

केस उपटल्यामुळे मढे हलके होत नाही – शुल्लक काटकसर करण्यात अर्थ नसतो

जानवे घातल्याने ब्राह्मण होत नाही – बाह्य वेष केल्यामुळे मूळ स्वभाव बदलत नाही

भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी – एखाद्याला आश्रय दिला तर तो त्यावर समाधान न मानता अधिक फायदा घेण्याचा प्रयत्न करतो

शितावरून भाताची परीक्षा – वस्तूच्या लहान भागावरून त्या संपूर्ण वस्तूची परीक्षा होती

हत्ती गेला पण शेपूट राहिले – कामाचा बहुतेक भाग पुर्ण होणे फक्त थोडेसे काम उरणे
marathi mhani list

100 + मराठी म्हणी

Marathi Mhani मराठी म्हणी व त्यांचे अर्थ

नक्की वाचा

समानार्थी शब्द
वीरुद्दार्थी शब्द

आशा करतो कि वरील दिलेल्या माहितीने आपण संतुष्ट असाल व Mpsc Exam मध्ये याचा आपल्यला खूप उपयोग याच प्रमाणे mpsc question पेपर मध्ये विचारले जाणारे काही Samanarthi ShabdVirudharthi Shabd, Vakprachar आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे ते ही तुम्ही अभ्यासु शकता.

वर दिलेले Marathi Mhani mpsc previous year Question Paper मध्ये वारंवार रिपीट झाले आहेत तर ते लक्षात राहावे म्हणून पुन्हा पुन्हा अभ्यासा व आपल्या मित्र मैत्रिणींना जे Mpsc exam ची तयारी करत आहेत त्याच्या सोबत ही  पोस्ट share करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *