मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ Marathi Vakprachar

मराठी वाक्प्रचार Marathi Vakprachar

Join Our Telegram Channel

Marathi Vakprachar मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ                               Marathi Vakprachar

मराठी वाक्प्रचार

मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ (500+)Marathi Vakprachar l Marathi Phrase l vakprachar meaning in marathi या घटकावर ५ वी ते १० वी पर्यंतच्या सर्व नवोदय, स्कॉलरशिप परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात तसेच Mpsc, Combine व इतर सर्व सरळ सेवा स्पर्धा परीक्षांमध्ये ही या घटकावर हमखास प्रश्न विचारले जातात.

वाक्प्रचार म्हणजे काय ?

शब्द समूहांचा मराठी भाषेत वापर करत असताना त्याच्या नेहमीच्या अर्थापेक्षा वेगळ्या भाषेत असलेल्या शब्दसमूहास वाक्प्रचार असे म्हणतात. उदाहरणार्थ : अंग टाकणे – विश्रांतीसाठी आडवे होणे , जीभ चाचरणे – बोलताना अडखळणे. पूर्वीच्या काळी लेखक व लोक अश्या प्रकारचे शब्दसमूह यांचा वापर फार मोठ्या प्रमाणावर करत असत

Marathi Vakprachar PDF

याच पोस्ट मध्ये आम्ही marathi vakprachar with meaning and sentence pdf share केली आहे त्याची link खाली Post मध्ये मिळेल.

मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ :
अंगाचा तिळपापड होणे अतिशय राग येणे

अंगार धगधगणे रागाने लाल होणे, अतिशय संतापाने

अंगारेधुपारे करणे – मांत्रिकाकडून उपचार करवणे, बुवाबाजीतले उपचार

अगतिक होणे – कोणताही मार्ग न दिसणे

अंकुश लावणे – ताब्यात ठेवणे

अंगवळणी पडणे – सवयीचे होणे

अंथरूण धरणे – बरेच दिवस आजारी पडणे

अक्कल जाणे – कोणताही विचार न करता कृती करणे

अचंबा वाटणे – चकित होणे

आगा बांधणे – तर्क काढणे

अंगावर घेणे – जबाबदारी स्वीकारणे

अक्षता देणे – आमंत्रण देणे, लग्न होणे

अधिकारारूढ होणे – सत्तेवर येणे

अधिकारारूढ होणे – सत्तेवर येणे

आकाशाला गवसणी घालणे – अशक्य गोष्ट साध्य करणे

अक्काबाईचा फेरा – भीक मागण्याची वेळ येणे

आटापिटा करणे – खूप कष्ट करणे, दगदग करणे

आतडी पिळणे – एखादे काम तळमळीने करणे

आत्मसात करणे – मिळवणे, प्राप्त करणे

आनंदलहरी उसळणे – खूप आनंद होणे

आंबून जाणे – कंटाळून जाणे

आभाळ फाटणे – खूप मोठे संकट कोसळणे

आयुष्य वेचणे – जीवनातला बराचसा काळ खर्ची घालवणे

आशा फोल ठरणे – ठरवलेप्रमाणे न होणे

आहारी जाणे – एखाद्या शुल्लक गोष्टीसाठी वेळ घालवणे

अरेरावी करणे – जबरदस्ती करणे

अन्नास जागणे – एखाद्या गोष्टीची जाणीव असणे

अभय देणे – सुरक्षेकतेची हमी देणे

अभिवादन करणे – वंदन करणे

अंग काढून घेणे – एखादी गोष्ट करण्यापासून दूर होणे

अंगद धरणे – लठ्ठ होणे

अर्धचंद्र होणे – हकालपट्टी करणे

अंगाची लाही होणे – खूप राग येणे

आकाश ठेंगणे होणे – अतिशय आनंद होणे

आकाश पातळ एक करणे – अतिशय आरडाओरड करणे

आकाश फाटणे – चारीही बाजुंनी संकट येणे

आग लावणे – झळ लावणे

आगीत तेल ओतणे – भांडण किंवा वाद विकोपाला पोहचणे

अठराविश्व दारिद्रय असणे – खूप गरिबी असणे

अटकेपार झेंडा लावणे – खूप मोठा प्रराक्रम गाजवणे

उघडे पडणे – गुप्त गोष्ट उघड होणे

ऊर फुटणे – खूप दम लागणे

ऊर भरून येणे – एखाद्या भावनेने अंतःकरण भरून येणे

कंकण बांधने – एखादे काम करण्यास प्रतीक्षा करणे

कट करणे – कारस्थान करणे

कंठ फुटणे – खणखणीत शब्द निघणे, वाचा फुटणे

कड दाटणे – अतिशय दुःख होणे

कणीक मऊ करणे – खूप मार देणे

कपाळाला हात लावणे – निराश होणे,नशिबाला दोष देणे

कपाळावर आठ्या पसरणे – आश्चर्य व्यक्त करणे

कपाळी असणे – नशिबात असणे

कळी उमलणे – आनंदित होणे

का-कू करणे – टाळाटाळ करणे

काजवे चमकणे – डोळ्यांपुढे अंधारी येणे

काढता पाय घेणे – निघून जाणे, माघार घेणे

कानगोष्टी करणे – हळू आवाजात कानात बोलणे

कानउघाडणी करणे – ताकीद देणे

कानमंत्र देणे – कानात युक्ती सांगणे

कानशिले तापणे – अतिशय राग येणे

कानाडोळा करणे – दुर्लक्ष करणे

कानात प्राण आणणे – अतिशय लक्षपूर्वक ऐकणे

कानोसा घेणे – चाहूल घेणे

कापरे भरणे – थरथर कापणे, भीती वाटणे

काबीज करणे – ताब्यात घेणे, जिंकणे

काम फत्ते होणे – काम यशस्वी होणे

कालवा-कालव होणे – जीवाची घालमेल होणे

कपाळमोक्ष होणे – नाश होणे

कमाल करणे – शेवटची मर्यादा गाठणे

कळसास पोहचणे – पूर्ण स्थितीला जाणे

कातडे पांघरणे – उसना आव आणणे

कानावर घालणे – महत्वाची गोष्ट सांगून ठेवणे

खजील होणे – अपराधी असलेच्या जाणिवेने शरण जाणे

खट्टू होणे – नाराज, नाखूष होणे

खंडा करणे – खेळातला डाव करणे

खनपटी ला बसने – हट्ट न सोडणे

खरडपट्टी करणे – चुकीबद्दल खूप रागावणे

खस्ता खाणे – त्रास सोसणे

खिजगणतीत नसणे – पर्वा न करणे

खिळखिळे होणे – मोडकळीस येणे

खीळ बसणे – अडसर निर्माण होणे

खुर्दा उडणे – दारुण पराभव होणे

खुशामत करणे – खोटी स्तुती करणे

खडे चारणे – पराभूत करणे

खडे फोडणे – दोष देणे

खटाटोप करणे – काही न काही काम करत राहणे

खसखस पिकणे – एकाच वेळी खूप लोकांना मोठ्याने हसू येणे

खार लागणे – नुकसान सोसावे लागणे

खाईत पडणे – संकटात सापडणे

खिसा गरम होणे – खूप पैसे मिळणे

खिशात टाकणे – फसविणे

खोड ठेवणे – कमतरता शोधणे

खोड मोडणे – एखाद्याची वाईट सवय शिक्षा देऊन नाहीशी करणे

खोऱ्याने पैसे ओढणे – खूप पैसे मिळणे

गंगा यमुना वाहू लागणे – खपू रडू येणे

गंडांतर येणे – मोठे संकट येणे

गंध नसणे – माहिती नसणे

गंडा घालणे – फसवणूक करणे

गळ टाकणे – अंदाज घेणे

गळ्यात येणे – एखादी गोष्ट जबरदस्ती ने स्वीकारावी लागणे

गगन ठेंगणे होणे – खूप आनंद होणे

गय करणे – क्षमा करणे

गट्टी जमणे – दाट मैत्री जुळणे

गडप होणे – बेपात्त, गडप होणे

गर्व गळणे – अहंकार नाहीसा होणे

गळचेपी करणे – अन्यायाने दाबून ठेवणे

गारद होणे – ठार होणे

गुढघे टेकणे – नम्र होणे

घाला घालणे – अचानक हल्ला करणे

घास गिळणे – ताब्यात घेणे

घटका भरणे – विनाशाची वेळ जवळ येणे

घरकोंबडा असणे – आपले घर न सोडणे

घबाड सापडणे – अचानक लाभ होणे

घडा भरणे – विनाशकाळ जवळ येणे

घाम गाळणे – खूप कष्ट करणे

चकित होणे – नवल वाटणे

चंग बांधणे – निश्चय करणे

चिटपाखरू नसणे – कोणीही नसणे

चाल करणे – हल्ला करणे

चितागती होणे – काळजीत बुडून जाणे

जर्जर होणे – पराभव, त्रास, कष्ट यामुळे हैराण होणे

जिवावर बेतणे – जीव धोक्यात येणे

जामून टाकणे – रागाने फाटकारने

जिकिरीचे वाटणे – कटकटीचे वाटणे

जीव खालीवर होणे – भीती वाटणे, घाबरणे

जीव जडणे – एखाद्या गोष्टीवर किंवा व्यक्तीवर खुप प्रेम होणे

झळ लागणे – नुकसान होणे

झोप उडणे – काळजीने झोप न लागणे

झेंडा नाचविणे – आपला पराक्रम बढाई ने सांगणे

झोप उडणे – अत्यंत काळजी करणे

डोके चढणे – खूप डोके दुखणे

डोंब उसळणे – संताप उफाळणे

डोळ्यांच्या खाचा होणे – दृष्टी जाणे

डोळ्यात भरणे – एखादी गोष्ट खूप आवडणे

तप घालणे – ध्यान करणे

तमा न बाळगणे – फिकीर, पर्वा न करणे

ताव काढणे – राग व्यक्त करणे

ताव मारणे – भरपूर खाणे, अन्नावर तुटून पडणे

ताळ सोडणे – मर्यादा सोडणे

दगडाशेंदूर फासणे – एखाद्याला अकारण महत्व देणे

दाद मागणे – दया याचना करणे

दारात हत्ती झुलणे – अतिशय श्रीमंत असणे

दिवे लावणे – पराक्रम करून दाखवणे

दिवस फिरणे – चांगली वेळ येणे

दोन हात करणे – सामना करणे

धक्का बसणे – मनावर परिणाम होणे

तिळ तिळ सुटणे – अतिशय चिंता वाटणे

थरकाप उडणे – भीतीने अतिशय घाबरणे

नजर रोखणे – दृष्टी केंद्रित करणे

दगडाला पाझर फुटणे – निर्दय मनुष्याला दयेची भावना येणे

दम खाणे – शांतता पाळणे

पदरमोड करणे – स्वतःजवळ चे पैसे खर्च करणे

पदरात पडणे – लाभ होणे, मिळणे

परागंदा होणे – घरदार, गाव, देश सोडून निघून जाणे

पाठपुरावा करणे – एखाद्या गोष्टीसाठी सतत प्रयत्न करत राहणे

पाठ वाकणे – आशा सोडून देणे

पाणउतारा करणे – अपमान करणे

पान न हालणे – कोणतेही कार्य न होणे

पाप्याचे पितर – पापी माणूस कधी श्रद्धा वगैरे करत नाही

पिसाट होणे – भ्रमिष्टपणा अनावर होणे

पोटात गोळा येणे – अतिशय भीती वाटणे

प्रस्थ वाढणे – अतोनात प्रशंसा होणे

प्राणांची बाजी लावणे – मरणाची पर्वा न करणे

फलद्रुप होणे – सिद्धीस जाणे

फारकत होणे – ताटातूट होणे, वेगळे होणे

बडगा उगारणे – धाक दाखवणे

बळी पडणे – तावडीत सापडणे

बाहुले बनवणे – एखाद्याला आपल्या मर्जी प्रमाणे वागवणे

बीमोड करणे – संपूर्ण नाश करणे

बेत आखणे – योजना तयार करणे

भलावण करणे – शिफारस करणे

भान असणे – जाणीव असणे

भिस्त ठेवणे – विश्वास ठेवणे

भ्रांत पडणे – खूप टंचाई असणे

भ्रमनिरास होणे – चुकीच्या कल्पना नष्ट होणे

मती खुंटणे – पुढे काय करायचे ते न समजणे

मरण कांडणे – हालअपेष्टा सहन करणे

माशी शिंकणे – एखाद्या कामात अडथळा येणे

मुरड घालणे – तडजोड करणे

री ओढणे – समर्थन करणे

लीन होणे – आदर प्रकट करणे

लोप पावणे – नष्ट, नाश होणे

वाचा फोडणे – अन्याया विरुद्ध बोलणे

वावडे असणे – एखादी गोष्ट अजिबात न चालणे

वीट येणे – कंटाळा येणे

वेध घेणे – बारीक निरीक्षणातून अंदाज घेणे

समाचार घेणे – विचारपूस करणे

सर येणे – बरोबरी होणे

साद घालणे – हाक मारणे

सोने होणे – आयुष्याचे सार्थक होणे

हात पाय गळणे – अवसान सुटणे, घाबरणे
vakprachar in marathi with meaning and sentence

Get Marathi Vakprachar Free Pdf of मराठी वाक्प्रचार

मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ                               Marathi Vakprachar

आशा करतो कि वरील दिलेल्या माहितीने आपण संतुष्ट असाल व Mpsc Exam मध्ये याचा आपल्यला खूप उपयोग होईल याच प्रमाणे mpsc question पेपर मध्ये विचारले जाणारे काही Samanarthi ShabdVirudharthi Shabd आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे ते ही तुम्ही अभ्यासु शकता.

वर दिलेले vakprachar mpsc previous year Question Paper मध्ये वारंवार रिपीट झाले आहेत तर ते लक्षात राहावे म्हणून पुन्हा पुन्हा अभ्यासा व आपल्या मित्र मैत्रिणींना जे Mpsc exam ची तयारी करत आहेत त्याच्या सोबत ही पोस्ट share करा.

Join Our Telegram Channel

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *